लिओ क्लब रत्नागिरी 2 चे पदग्रहण

लिओ क्लब रत्नागिरी 2 चे पदग्रहण

७ ( पान ६ साठी)
-----------

‘लिओ क्लब रत्नागिरी २ ’चे पदग्रहण

संस्थापक अध्यक्षपदी सिद्धी केळकर

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : लायन्स आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये लिओ क्लबला अनन्यसाधारण महत्व आहे. विद्यार्थीदशेमध्येच त्यांचा सर्वांगीण विकास आणि समाजसेवेची आवड निर्माण करण्याचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार लिओ क्लब रत्नागिरी २चा पदग्रहण सोहळा सोलापूर येथे झाला. यामध्ये लिओ सिद्धी केळकर यांची संस्थापक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे लिओ क्लबची स्थापना करण्यात आली. त्यासाठी दत्तप्रसाद कुळकर्णी, पराग पानवलकर, श्रद्धा कुळकर्णी, ओंकार फडके, झोन चेअरपर्सन श्रेया केळकर व अध्यक्ष शिल्पा पानवलकर यांनी मेहनत घेतली. स्थापनेच्या प्रक्रियेत सोलापूर येथील लिओ डिस्ट्रिक्ट चेअरमन लायन अतुल सोनिग्रा व लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट पवन यांचे विशेष सहकार्य लाभले.
शनिवारी (ता. ४) सायंकाळी पीएमजेएफ पीडीजी लायन जगदीश पुरोहित यांच्या पौरोहित्याखाली आणि झोन चेअरपर्सन श्रेया केळकर व ट्रस्ट अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन लिओ क्लबचा शपथग्रहण लायन्स ट्रस्टच्या आय हॉस्पिटलच्या सभागृहामध्ये झाला.
लायन्सच्या प्रथेनुसार अध्यक्षा शिल्पा यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्रद्धा हिच्या ध्वजवंदन वाचनाने सभेला सुरवात झाली. श्रेया यांनी लिओ क्लबबद्दल विस्तृत माहिती दिली तर लिओ अॅडव्हायझरला दत्तप्रसाद यांनी लिओ क्लबच्या प्रथम अध्यक्षा लिओ सिद्धी केळकर, सचिव लिओ स्वयम पानवलकर, खजिनदार लिओ शार्दुल पाटणे यांची सभागृहाला ओळख करून दिली. यानंतर सूत्रसंचालक दत्तप्रसाद केळुसकर यांनी प्रमुख शपथप्रदान अधिकारी जगदीश पुरोहित यांची सभागृहाला ओळख करून सभेची सारी सुत्रे त्यांच्याकडे सोपवली. PMJF ला. जगदीश पुरोहित यांनी सिद्धी केळकर, स्वयम पानवलकर, शार्दुल पाटणे यांना अनुक्रमे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार म्हणून आणि उपस्थित सभासदांना लिओ सभासदत्वाची टाळ्यांच्या गजरात शपथ दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com