विनोदाला कारूण्याची झालर ''जिन चिक जिन''

विनोदाला कारूण्याची झालर ''जिन चिक जिन''

rat११९.txt

बातमी क्र. ९ ( पान ६ साठी )

rat११p१.jpg-रत्नागिरी ः पानवल-होरंबेवाडी येथे गगनगिरी आश्रमाच्या वर्धापनदिनात सादर झालेल्या जिन चिक जिन या नाटकातील एक क्षण.
-------
विनोदाला कारूण्याची झालर ‘जिन चिक जिन’

बंद पडत चाललेल्या घरांची खंत ; वेगळ्या ढंगात नाटकाची मांडणी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः तालुक्यातील पानवल-होरंबेवाडी येथील प. पु. स्वामी गगनगिरी आश्रमाच्या वर्धापनदिनानिमित्त लेखक मनिष साळवी यांच्या लेखणीतून उतरलेल्या नव्या कोऱ्या ''जिन चिक जिन'' या धमाल विनोदी नाटकाचा प्रयोग सादर झाला. कोकणात बंद पडत चाललेल्या घरांची खंत विनोदी ढंगाने मांडण्यास नाट्यशोध संस्था यशस्वी झाली. अगदी वेगळ्या धाटणीच्या या नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जिन चिक जिन या नाटकाच्या कथानकाला कोकणातील एका गावातील गावचे खोत (कै.) प्रतापराव परब यांच्या अनेक वर्ष बंद असलेल्या घरापासून सुरू होते. नाटकाचा निवेदक वजा मुख्य पात्र ''राजू गावकार'' या नाटकाची गोष्ट सांगायला सुरवात करतो. या बंद पडलेल्या घरात काहीतरी मौल्यवान वस्तू लपली आहे. ती शोधण्यात आशू म्हणजेच नाटकातील दुसरे प्रमुख पात्र पण त्याची होणारी फजिती रसिकांना पाहायला मिळते. नाटकाच्या दुसऱ्या अंकात एक एक पात्र वाढत जाऊन अनेक वर्ष बंद असलेलं घर अचानक का भरून गेलं, याची अनुभुती येते. कोकणात बंद पडत चाललेल्या घरांना पाहून जी खंत मनात निर्माण होते तिच खंत मांडत या नाटकाचा भावनिक; परंतु गोड शेवट होतो.
कोकणातील एक ज्वलंत विषय विनोदी पद्धतीने सांगणारं आणि ‘विकणं सोपं आहे; पण जपणं कठीण’, या आशयाच्या विनोदी नाटकाला रसिकांनी दाद दिली. या नाटकात कोकणी भाषेतील संवाद असल्यामुळे हे नाटक खूप जवळचं वाटतं. दिग्दर्शनाचे शिवधनुष्य दिग्दर्शक गणेश राऊत यांनी खूप ताकदीने पेलवलंय. दिग्दर्शनात केलेले नवीन प्रयोग प्रामुख्याने नाटकाचं कथानक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम केलं आहे. जिन चिक जिन या नाटकात राजू गावकार-स्वप्नील धनावडे, आशुतोष-किरण राठोड, प्रियंका- आसावरी राऊत-आखाडे, प्रकाशकाका-तन्मय राऊत, काकी-साक्षी कोतवडेकर, महेश-तुषार गिरकर आणि राजेश/ जिन-रोहन शेलार यांच्या अभिनयातून नाटक सहजसुंदर झाले. त्याला प्रकाशयोजना-शेखर मुळ्ये, कीबोर्ड-ऋतुराज बोंबले, पखवाज -पार्थ देवळेकर ढोलकी-आयुष कळंबटे यांनी साथसंगत केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com