जिल्ह्यात २२५ असाक्षर झाले ''नवसाक्षर''

जिल्ह्यात २२५ असाक्षर झाले ''नवसाक्षर''

जिल्ह्यात २२५ असाक्षर झाले ‘नवसाक्षर’
परीक्षेचा १०० टक्के निकालः उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ः केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम (एन. बी. एस. के.) २०२२-२७ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १७ मार्चला घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफ. एल. एन. एटी.) परीक्षेला जिल्ह्यातून २२५ असाक्षर प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आसून, जिल्ह्यातील २२५ असाक्षर नवसाक्षर झाले आहेत.
या सर्व असाक्षरांची परीक्षा जवळच्या प्राथमिक, माध्यमिक शाळेमध्ये घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या (एनआयओएस) ww.nios.ac.in or https://results.nios.ac.in या संकेतस्थळावर जाहीर केलेला आहे. ज्या असाक्षरांची नोंद उल्लास ॲपवर केली होती, अशाच असाक्षरांना परीक्षेला बसण्याची परवानगी होती. उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची संख्या २५६ होती. पैकी २२५ असाक्षर परीक्षेला प्रविष्ठ होते. ३१ असाक्षर परीक्षेस प्रविष्ठ झाले नाहीत. उल्लास ॲपवर नोंद होणाऱ्या असाक्षरांची परीक्षा चालू वर्षी सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख म्हणाले, ‘‘२०२२ ते २७ या कालावधीत नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, २०२४-२५ मध्ये ४७२१ असाक्षरांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असल्याचे सांगितले. असाक्षर व्यक्तींनी आपली नावे आपल्या गावातील प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांकडे नोंद करावीत व साक्षरतेचा टक्का वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.’’
शिक्षण संचालनालय (योजना) तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरतेत प्रथम क्रमांकावर आहे. चालू वर्षी एकूण २२५ असाक्षरांनी परीक्षा दिली. असाक्षरांचा निकाल १०० टक्के लागला असून, साक्षरतेत २२५ लोकांची भर पडली आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व नवसाक्षरांना साक्षरतेचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक यांच्याकडे शिक्षण संचालनालय (योजना) यांच्यामार्फत दिली जाणार आहेत.’’

चौकट
जिल्हा १०० टक्के साक्षर करण्यावर भर
जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी उत्तीर्ण परीक्षार्थ्यांसह सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, सर्व स्वयंसेवक, सर्व सर्वेक्षक, सर्व मुख्याध्यापक व तालुकास्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा १०० टक्के साक्षर करण्यावर सर्वांनी भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com