गाड्या विलंबाने

गाड्या विलंबाने

१५ (पान ५ साठी)

‘कोरे’ मार्गावरील अनेक गाड्या विलंबाने

प्रवासी नाराज ; ३० टक्के जास्त दराची तिकिटे
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ ः कोकण रेल्वेमार्गावरील अनेक गाड्या विलंबाने धावत असल्यामुळे कोकणात येणारे चाकरमानी आणि पर्यटकांचे प्रचंड हाल होत आहेत. एलटीटी-मडगांव ही गाडी आठ तास, तेजस साडेचार तास तर मांडवी दोन तास विलंबाने धावत आहे.
उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाला असून, चाकरमानी गावाकडे परतू लागले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील बहुसंख्य गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. काही चाकरमानी एसटीने तर काही खासगी गाड्यांनी येत आहेत. मुंबईमधून गावी येण्यासाठी चाकरमान्यांची झुंबड उडाली आहे. प्रवाशांकडून विशेष तिकीटदर आकारून सुट्टी विशेष गाड्या सोडल्या जातात. या गाड्यांना तिकीटदराशिवाय काही विशेष नसते. ३० टक्के जास्त तिकीटदर घेऊन या गाड्या अनियमित वेळेत धावत असतात. यातच भर म्हणून एलटीटी-मडगाव ही गाडी गेले अनेक दिवस ४ ते ५ तास विलंबाने धावत आहे. आज हीच गाडी सुमारे आठ तास विलंबाने धावत आहे. कोकण रेल्वेमार्गावरील वंदे भारतनंतरची सर्वात आलिशान गाडी तेजस एक्स्प्रेस आज सुमारे साडेचार तास विलंबाने धावत आहे. मांडवी एक्स्प्रेस सुमारे २ तास तर राजधानी एक्स्प्रेस एक तास, ओखा एक्स्प्रेस सुमारे अडीच तास उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळेत कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांना प्रचंड गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com