तुरळ- चिखली रस्त्याचे काम पाडले बंद

तुरळ- चिखली रस्त्याचे काम पाडले बंद

३ ( पान ५ मेन)
---

- rat११p४.jpg -
२४M८२९२५
साडवली - तुरळ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

तुरळ- चिखली रस्त्याचे काम पाडले बंद

दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप ; ग्रामस्थांच्या तोंडाला पुसली पाने

सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ११ : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ ते चिखली या रस्त्याचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले; मात्र हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. शुक्रवारपासून या रस्त्याच्या डांबरीकरणास सुरवात झाली; मात्र हे काम एस्टीमेटप्रमाणे होत नसून, निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा आक्षेप घेत ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादानंतर हे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे .
तुरळ-चिखली रस्त्याचे सन २०२० मध्ये करोडो रुपये खर्च करून करण्यात आलेले काम निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. वर्षभरातच हा रस्ता खराब झाला ही आरोपाला एकप्रकारे मिळालेली पुष्टी आहे. यानंतर रिक्षा संघटनेच्या पाठपुराव्यानंतर पुन्हा या रस्त्याच्या जवळजवळ अडीच कोटीच्या नवीन कामाला मंजुरी देण्यात आली; मात्र पुन्हा निकृष्ट काम केल्याचा आरोप असलेल्या ठेकेदाराला हे काम देण्यात आल्याने ग्रामस्थांनी विरोध दर्शविला; मात्र राजकीय दबावापुढे ग्रामस्थांचा विरोध दुर्लक्षित करण्यात आला. काम सुरू झाल्यापासून अत्यंत धीम्या गतीने हे काम सुरू असल्याचे दिसून येते. गेले दोन महिने फक्त साईडपट्टीचे काम सुरू असल्याचे दिसून येते. हे कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .
शुक्रवारपासून या रस्त्याच्या प्रत्यक्ष डांबरीकरणास सुरवात करण्यात आली; मात्र हे काम कोणत्याही सुपरवायझरशिवाय चालू असल्याचे समजताच ग्रामस्थांनी पाहणी केली. बीबीएमसाठी चाळीस ते पन्नास एमएमची खडी आवश्यक असताना वीस ते तीस एमएमची खडी वापरून हे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण, शिवसेना (उबाठा) उपविभागप्रमुख अरविंद जाधव, विजय कुवळेकर, संतोष नागवेकर व ग्रामस्थांनी हे काम बंद करण्यास सांगितले व ही बाब कडवईचे उपसरपंच दत्ताराम ओकटे यांना सांगितली. त्यांनी बांधकाम विभागाशी संपर्क केला असता फोनवरूनच उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली तसेच आपण हे काम थांबवले तर यावर्षी हे काम होणार नसल्याचे सांगण्यात आले.
---------------

ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत

या रस्त्याच्या एस्टीमेटची मागणी करूनही ते दिले जात नसल्याचे रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. पावसाळा तोंडावर आला असताना हे काम सुरू केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. बांधकामाच्या नियमाप्रमाणे १५ मे नंतर काम करणे चुकीचे असताना १० मे रोजी काम सुरू करून कामाला चुना लावण्याचा मनसुबा असल्याचे बोलले जात आहे. येथील ग्रामस्थ संतप्त झाले असून, आंदोलनाच्या तयारीत आहेत.
------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com