Homeopathy
Homeopathy Sakal

Homeopathy : होमिओपॅथीबद्दल सकारात्मक भावना रूजविण्यात यश

डॉ. शिवाजी मानकर; ''वैद्यरत्न'' पुरस्कार ही कामाची पोचपावती

रत्नागिरी : गेली ३७ वर्षे निष्ठापूर्वक होमिओपॅथीची प्रॅक्टिस करून हजारो रुग्णांना व्याधीमुक्त केल्याने या पॅथीचे महत्व लोकांमध्ये पोचले आहे. होमिओपॅथीबद्दल ही सकारात्मक भावना आणि विश्वास रुग्णांमध्ये निर्माण करण्यात मला जे काही यश आले त्याला मिळालेली पोचपावती म्हणजे हा ''वैद्यरत्न'' पुरस्कार आहे, अशी भावना डॉ. शिवाजी मानकर यांनी व्यक्त केली.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचा मेळावा नुकताच गुहागर येथे पार पडला. या वेळी डॉ. शिवाजी मानकर यांना ''वैद्यरत्न'' पुरस्कार व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कोकणासारख्या भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागात होमिओपॅथीचे बीज मानकर यांनी रूजवले. दुर्धर व जुनाट आजारांनी जर्जर झालेल्या रुग्णांवर उपचार करून अनेकांना व्याधीमुक्त केले.

कोरोनाकाळात होमिओपॅथी पद्धतीने उपचार करणारे कोकणातील पहिले कोविड सेंटर त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने चालवले. होमिओपॅथी उपचार करणारे भारतातील ते दुसरे कोविड सेंटर होते. यासह गेल्या ३७ वर्षात केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
या पुरस्काराबाबत बोलताना डॉ. मानकर म्हणाले, ३७ वर्षे फक्त आणि फक्त होमिओपॅथीची प्रॅक्टिस केली.

जिल्ह्यात अशी प्रॅक्टिस करणारे अपवादानेच होते. किंबहुना नव्हतेच म्हटले तरी चालेल. त्यामुळे होमिओपॅथी उपचारांबद्दल रुग्णांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे आव्हान होते. जुनाट आजार बरे होऊ शकतात, हा विश्वास रुग्णांना मिळाला आहे.

सध्या पुढील पिढी या शास्त्राकडे वळत आहे; मात्र आयुर्वेद व होमिओपॅथी यात काम करणारे उपलब्ध साधनसामुग्री व पूर्वासुरींनी केलेले काम या आधारे प्रॅक्टिस करतात; मात्र नवीन पिढीने संशोधनाची कास धरली पाहिजे. सध्या लिव्हर सिरॉसिस, असायटिस यावर विशेषत्वाने होमिओपॅथी उपचारांआधारे काम करत आहे.

उपचार व संशोधन केंद्र उभारणार

३७ वर्षे प्रॅक्टिसच्या काळात गेली दहा वर्षे मी संशोधन करत आहे. आता प्रामुख्याने संशोधनाकडे वळणार आहे. जिल्ह्यात होमिओपॅथीद्वारे अद्ययावत उपचार आणि संशोधन यासाठी विशेष केंद्र उभारणार आहे.

या द्वारे या पॅथीचा प्रसार करून अधिकाधिक रुग्णसेवा साध्य करण्याचा मानस आहे. रुग्ण बरा करणे हे कोणत्याही पॅथीचे प्रमुख उद्दिष्ट असते, हे लक्षात घेता होमिओपॅथी अथवा आयुर्वेद कॉम्प्लिमेंटरी म्हणून वापरण्यात बड्या शहरातील डॉक्टरांचा कल असतो; मात्र फार कमी डॉक्टर असे करतात, असे निरीक्षण डॉ. मानकर यांनी नोंदले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com