''पदवीधऱ''साठी अॅड. राणेंना उमेदवारी द्या

''पदवीधऱ''साठी अॅड. राणेंना उमेदवारी द्या

swt111.jpg
82954
कुडाळः येथे आयोजित पत्रकार परिषदेवेळी उपस्थित ‘युथ फोरम’चे पदाधिकारी.

‘पदवीधर’साठी अॅड. राणेंना उमेदवारी द्या
भूषण गावडेः ‘युथ फोरम’तर्फे शिंदे शिवसेनेकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ः युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. यशवर्धन राणे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यास त्यांना युथ फोरम व युवकांचा पूर्ण पाठिंबा असेल, अशी भूमिका पत्रकार परिषदेत युथ फोरमच्या वतीने भूषण गावडे यांनी जाहीर केली. राणे यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी शिंदे शिवसेनेकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुडाळ येथे युथ फोरमच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी युथ फोरमचे जिल्हाध्यक्ष शुभम सिंदगिकर, रोहन करमळकर, केतन शिरोडकर, भूषण मेस्त्री, प्रथमेश नाईक, अभिजीत येडगे, हेमंत धोपेश्वरकर, भूषण गावडे, धनराज चव्हाण, गोपाळ राऊळ, सौरभ शिरसाट, सौरभ राऊळ, सर्वेश पावसकर, विराज बांदेकर, जावेद मेमन, दीपक राऊळ, प्रकाश रजपूत, हरेश कुडाळकर, हर्षद गाडी, गोपाळ तेली, सचिन पावसकर, नंदराज पावसकर, अक्षय पावसकर, मंदार खोत,  प्रथमेश खोत, योगेश हेरेकर, सुदेश खोत आदी उपस्थित होते.
गावडे म्हणाले, ‘युथ फोरममधून युवक वर्ग काम करीत आहे. युथ फोरमचे अध्यक्ष राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून महाराष्ट्रभर काम सुरू आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवित आहोत. होऊ घातलेल्या पदवीधर निवडणुकीसाठी राणे इच्छुक आहेत. सर्व युवकांचा राणे यांच्या उमेदवारीला पाठिंबा आहे.’
दर्शन पाटकर यांनी म्हणाले की, ‘यशवर्धन राणे यांनी वयाच्या १८ व्या वर्षी युथ फोरमची स्थापना केली. युथ फोरमच्या माध्यमातून महिला, मुले, युवा व बेरोजगार यांचे अनेक प्रश्न सोडविले. ‘जिथे गाव तिथे युवा फोरम’ हे ब्रीद घेऊन संस्था गावागावांत पोहोचलेली आहे. राणे यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी राणे यांचे नाव आम्ही पुढे घेऊन जात आहोत.’
युथ फोरमचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष धनराज चव्हाण यांनी, आम्ही राणे यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत, असे सांगितले. संस्थेच्या माध्यमातून गेली अकरा वर्षे दिव्यांगांची सेवा सामाजिक भावनेतून करीत आहोत. रत्नागिरीपर्यंत काम केले. दिव्यांगांच्या व्यथा, समस्या आहेत. सर्वेश पावसकर व यशवर्धन राणे यांनी या व्यथा समजून घेत युवा फोरमच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सहकार्य केले आहे. राणे यांना उमेदवारी मिळाल्यास आमचे सर्व दिव्यांग बांधव त्यांना पाठिंबा देतील, असे काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्था अध्यक्ष विनोद धुरी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com