साटम महाराज जयंतीदिनी दाणोलीत दर्शनासाठी गर्दी

साटम महाराज जयंतीदिनी दाणोलीत दर्शनासाठी गर्दी

swt115.jpg
82960
दाणोलीः साटम महाराज यांच्या जयंती उत्सवास भाविकांची झालेली गर्दी.

साटम महाराज जयंतीदिनी
दाणोलीत दर्शनासाठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ११ः योगियांचे योगी असलेल्या दाणोली येथील साटम महाराजांचा जयंती उत्सव शुक्रवारी (ता. १०) विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. अक्षय तृतीयेच्या सुवर्ण पर्वणीला साटम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
या जयंती उत्सवानिमित्त भाविक साटम महाराज चरणी लीन झाले. यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे काकड आरती, अभ्यंगस्नान व त्यानंतर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते पाद्यपूजा आदी धार्मिक कार्यक्रम झाले. साटम महाराजांची उत्सवमूर्ती व समाधी परिसराला आकर्षक फुलांनी सजविले होते. समाधी मंदिरात अक्षय सावंत व भक्ती सावंत यांच्या हस्ते श्रींची महापूजा झाली. दुपारी महाआरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी दाणोलीचे तीर्थक्षेत्र असलेल्या नागझरीलाही भाविकांनी भेट दिली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साटम महाराजांचे दर्शन घेतले. सायंकाळी उशिरा महाआरतीनंतर पालखी सोहळ्याने या जयंती उत्सवाची सांगता झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com