पणदूर महाविद्यालयाला ''नॅक'' मानांकन

पणदूर महाविद्यालयाला ''नॅक'' मानांकन

swt116.jpg
82965
पणदूर महाविद्यालय

पणदूर महाविद्यालयाला ‘नॅक’ मानांकन
‘सी’ श्रेणीः ‘विनाअनुदानित’मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाला ''नॅक''कडून ''सी'' श्रेणीचे मानांकन मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी नॅक मूल्यांकन व अधिस्वीकृती प्रक्रिया पूर्ण करणारे वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूर तिठा हे पहिले महाविद्यालय ठरले आहे.
''नॅक'' या अखिल भारतीय अधिस्वीकृती परिषद बेंगळुरूमार्फत २ व ३ मे या दोन दिवशी त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन सर्वांगीण मूल्यमापन केले. त्यामध्ये ओडिसा मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अर्काकुमार दास मोहपात्रा (अध्यक्ष), म्हैसूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. ए. बालासुब्रमनियन (समन्वयक), सिल्वासा येथील एस.एस.आर. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव सिंग सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या मान्यवरांनी पणदूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व भौतिक, शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक कामकाज, शैक्षणिक उपक्रम, उत्कृष्ट निकाल परंपरा, शिस्त, गुणवत्ता, क्रीडा व सांस्कृतिक सुविधा इत्यादी सर्व घटकांची गेल्या पाच वर्षांतील तपशीलवार माहिती घेऊन व पडताळणी करून आपला अंतिम अहवाल प्राचार्यांकडे सुपूर्द केला. महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्यासाठी गेली दहा वर्षे चेअरमन (कै.) शशिकांत अणावकर यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्राचार्य, संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अहोरात्र प्रयत्न करून गेली दोन वर्षे सर्व आवश्यक दस्तऐवज, कागदपत्रे इत्यादींची पूर्तता करून ''नॅक'' ला अहवाल सादर करण्यात यश संपादन केले. या समितीने महाविद्यालयाच्या गुणात्मकतेचा सर्वांगीण आढावा घेऊन मूल्यमापन केले व समाधान व्यक्त केले.
''नॅक'' तपासणीच्या सर्वांगीण तयारीसाठी प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आय.क्यू.ए.सी.च्या समन्वयक श्रुती कोदे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांमध्ये निखिल सोनार, तुषार मठकर, ग्रंथपाल सुशांत वालावलकर, कर्मचारी रुपेश शिरोडकर, सूरज साईल, दीपाली सावंत या सर्वांनी मेहनत घेतली. या सर्वांना संस्थेचे अध्यक्ष पुष्कराज कोले, उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, कार्याध्यक्ष डॉ. मोहन प्रभू, सचिव डॉ. अरुण गोडकर, संचालक डॉ. गुरुप्रसाद अणावकर, संचालिका प्राचार्या डॉ. प्रज्ञा प्रभू व अन्य मान्यवर संचालकांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले. या मूल्यमापनासाठी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, देणगीदार, माजी विद्यार्थी, संस्थेचे हितचिंतक यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
वेताळबांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आप्पा गावडे, शिवाजी इंग्लिश स्कूल प्रशालेचे कर्मचारी राजा राणे, प्रवीण गुरव, प्रतीक राणे, प्रसाद साईल, हर्षद चव्हाण, इंदू राठोड यांचेही सहकार्य लाभले. महाविद्यालयाला ''नॅक''कडून ''सी'' श्रेणीचे मानांकन मिळाले असून, गुरुवर्य (कै.) शशिकांत अणावकर यांचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी नॅक मूल्यांकन व अधिस्वीकृती प्रक्रिया पूर्ण करणारे वेंगुर्लेकर महाविद्यालय पहिले ठरले असून, महाविद्यालयाच्या इतिहासातील हा एक सुवर्ण क्षण ठरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com