देवगड़ात मारहाणप्रकरणी 
दहा जणांविरोधात तक्रार

देवगड़ात मारहाणप्रकरणी दहा जणांविरोधात तक्रार

देवगड़ात मारहाणप्रकरणी
दहा जणांविरोधात तक्रार
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ११ ः येथील पवनचक्की भागातील काही स्टॉल व्यावसायिकांमधील वादाचे पडसाद उमटले. यातून दोन गटांत वादंग झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १०) सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत दोन गटातील महिलांनी आपापल्या तक्रारी नोंदविल्या आहेत.
याबाबत पोलिसांत एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पवनचक्की भागातील स्टॉलवर शुक्रवारी (ता. १०) सायंकाळच्या सुमारास खाद्यपदार्थ बनवित असताना बाजूच्या स्टॉलधारकाने येऊन तिच्या नातेवाइकांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तिलाही मारहाण केली. याबाबत तिने एकूण पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे, तर दुसऱ्‍या गटातील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून, बाजूच्या स्टॉलवरील युवकाने तिच्या कुटुंबातील व्यक्तींना शिवीगाळ केली. याबाबत विचारणा करण्यासाठी गेली असता तिच्यासह तिच्या पतीलाही मारहाण केली. मारहाणप्रकरणी तिने एकूण पाच जणांविरुद्ध आपली फिर्याद दिली. दोन गटांतील मिळून एकूण दहा जणांवर येथील पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. अधिक तपास पोलिस हवालदार उदय शिरगांवकर करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com