बांद्यात विचित्र अपघातात नऊ जखमी

बांद्यात विचित्र अपघातात नऊ जखमी

swt1115.jpg
83037
बांदाः अपघातामध्ये टेम्पो आणि ट्रॅव्हल्सचे झालेले नुकसान. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांद्यात विचित्र अपघातात नऊ जखमी
तीन वाहनांची धडकः पावसामुळे मदतकार्यास उशीर
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ः मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा स्मशानभूमी समोर वाहतूक कोंडीत अडकलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सला डंपरने मागून धडक दिल्याने टेम्पो ट्रॅव्हल्स समोर उभ्या असलेल्या टेम्पोला धडकली. यात ट्रॅव्हल्समधील नऊ प्रवासी जखमी झाले. मुसळधार पाऊस असल्याने अपघातानंतर तब्बल अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रवाशी गाडीतच होते. अखेर स्थानिकांनी स्वतःच्या वाहनाने सर्व जखमींना बांदा प्राथमिक केंद्रात दाखल केले.
रत्नागिरी-वरवडे येथील पिरणकर व आढाव परिवार देवदर्शनासाठी गोवा येथे टेम्पो ट्रॅव्हल्सने (क्रमांक एमएच ०८ बीसी ५०९९) गेले होते. देवदर्शन आटोपून रत्नागिरी येथे परतत असताना हा अपघात झाला. बांदा स्मशानभूमी येथे महामार्गावर वाहतूक कोंडी असल्याने टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने गाडी थांबविली. त्याच दरम्यान गोव्यातून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या डंपरच्या (क्रमांक एमएच ०७ एजे ५३३७) चालकाचे पावसामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे डंपरने ट्रॅव्हल्सला धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की, ट्रॅव्हल्स समोर उभे असलेल्या टेम्पोला धडकली. डंपर चालकाने प्रसंगावधान राखून डंपर दुभाजकावर घातल्याने ट्रॅव्हल्सची मोठी हानी झाली नाही; मात्र मागच्या व दर्शनी भागाचे नुकसान झाले.
या अपघातात सिद्धिका प्रजय आढाव (वय १५), पलक प्रशांत आढाव (वय १४), प्रतिभा प्रकाश आढाव, स्वरा महेश पिळणकर (वय १४), समृद्धी प्रजय आढाव (वय १८), तेजल महेश पिरणकर (वय २३), हर्षदा महेश पिरणकर, प्रकाश लक्ष्मण आढाव, महेश मारुती आढाव (वय ३५) असे नऊ जण जखमी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com