‘चमकणारी आळंबी’ची महाराष्ट्राच्या जैवविविधतेमध्ये नोंद

‘चमकणारी आळंबी’ची महाराष्ट्राच्या जैवविविधतेमध्ये नोंद

83115
83116
चमकणारी आळंबी

83113
मंगेश माणगावकर

83114
योगेश प्रभू


‘चमकणारी आळंबी’ची महाराष्ट्राच्या जैवविविधतेमध्ये नोंद

होडावडा येथे आढळ ः मंगेश माणगावकरांकडून संशोधन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः होडावडे (ता. वेंगुर्ले) गावात मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत गतवर्षी पावसाळ्यात सापडलेली ‘बायोल्युमिनीकंस मशरूम’ म्हणजेच ‘चमकणारी आळंबी’ची अधिकृत नोंद महाराष्ट्राच्या जैवविविधतेमध्ये झाली आहे.
याआधी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्य आणि सिंधुदुर्गमधील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रांमध्ये प्रकाशमान बुरशीची नोंद झाली आहे; परंतु होडावडे येथे सापडलेली चमकणाऱ्या आळंबीची नोंद महाराष्ट्रामध्ये प्रथमच झाली असून, भारतातील केरळ आणि गोवा राज्यानंतर महाराष्ट्र हे तिसरे राज्य ठरले आहे. या चमकणाऱ्या आळंबीचे नाव ‘मायसेना क्लोरोफॉस’ असून, या आळंबीची नोंद २६ एप्रिल २०२४ ला ‘जर्नल ऑफ थ्रेडेंट टेक्सा’ या नियतकालिकेत प्रसिद्ध झाली आहे. या संशोधनासाठी कुडाळच्या संत राऊळ महाराज कॉलेजचे संशोधक प्रा. डॉ. योगेश कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे श्री. माणगावकर यांनी नमूद केले. महाराष्ट्रात प्रथमच याची नोंद झाल्यामुळे सिंधुदुर्गच्या जैवविविधतेमध्ये भर पडली असून, होडावडा गावाच्या नावलौकिकात भर पडली आहे तसेच अभ्यासकांना, पर्यावरणप्रेमींसाठी या आळंबीच्या अभ्यासाची संधी मिळाली आहे. या आळंबीबरोबरच माणगावकर यांनी त्यांच्या बागेत आढळलेल्या विविध पक्षी, फुलपाखरे, साप आणि बेडकांच्या जातींची नोंदी केल्या असून, त्यांच्या बागेला विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com