पावशीत मंगळवारी
डॉ. आंबेडकर जयंती

पावशीत मंगळवारी डॉ. आंबेडकर जयंती

पावशीत मंगळवारी
डॉ. आंबेडकर जयंती
कुडाळ ः नवजीवन विकास मंडळ पावशी, पावशी बौद्ध विकास संघ मुंबई, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ गावशाखा पावशी, जागृती महिला विकास मंडळ यांच्यातर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वी जयंती उत्सव मंगळवारी (ता. १४) शाक्यनगर-पावशी येथे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ९ वाजता पंचशील ध्वजवंदन, पूजा, वंदना, १० वाजता अभिवादन सभा, जाहीर सत्कार, बक्षिस वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून साहित्यिक प्रकाश तेंडोलकर, कुमार खिरुगडे (कागल, कोल्हापूर) हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी १ वाजता स्नेहभोजन, ३.३० वाजता पावशी सरपंच वैशाली पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला स्नेहमेळावा, सायंकाळी ५.३० वाजता सामाजिक ऐक्य सद्‍भावना रॅली, रात्री ९ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम (सादरकर्ते-अश्वघोष सांस्कृतिक कलामंच पावशी, जागृती महिला विकास मंडळ पावशी), रात्री १० वाजता खास आकर्षक इशिका डान्स ग्रुप, कणकवली यांचा ‘साद मराठीची’ हा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
---
कलमठला शनिवारी
डबलबारी सामना
कणकवली ः कलमठ-कुंभारवाडी येथील श्री साईगणेश मंदिराचा सोळावा वर्धापन दिन सोहळा १८ व १९ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. या वेळी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी (ता. १८) पहाटे ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ७.३० वाजता नित्यपूजा, सायंकाळी ८ वाजता दैनंदिन आरती, रात्री ९ वाजता स्थानिक महिला मंडळाचा नृत्याविष्कार, रविवारी (ता. १९) पहाटे ५.३० वाजता काकड आरती, ७.३० वाजता लघुरुद्र, अभिषेक, ८.३० वाजता ‘श्रीं’ची महापूजा, दुपारी १२.३० वाजता महाआरती, तीर्थप्रसाद, १ वाजता महाप्रसाद, दुपारी ४.३० वाजता साईंची सवाद्य मिरवणूक, रात्री ९ वाजता श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्देचे (ता. कुडाळ) बुवा विजय ऊर्फ गुंडू सावंत व श्री महादेश्‍वर प्रासादिक भजन मंडळ, नाडणचे (ता. देवगड) बुवा संदीप पुजारे यांच्यात आमने-सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन साईगणेश मित्रमंडळ व कलमठ-कुंभारवाडी ग्रामस्थ, आकांक्षा मित्रमंडळ, मुंबई यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com