महर्षी कर्वे नर्सिंग कॉलेजमध्ये परिचारिका सप्ताह

महर्षी कर्वे नर्सिंग कॉलेजमध्ये परिचारिका सप्ताह

rat12p16.jpg-
83190
रत्नागिरी : महर्षी कर्वे संस्थेच्या कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये परिचारिका सप्ताहानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देताना प्रज्ञा बसणकर. सोबत संपदा जोशी, अर्चना बाईत आदी.
------------
कर्वे नर्सिंग कॉलेजमध्ये
परिचारिका सप्ताह
रत्नागिरी, ता. १२ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. ६ ते १२ मे दरम्यान विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन केले.
परिचारिका सप्ताहादरम्यान न्यूट्रीशन दिवसही साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती दाखवून सादरीकरण केले. समतोल आहार, मधुमेहसाठीचा आहार, उच्च रक्तदाबासाठीचा आहार, कमी प्रथिंनाचा आहार असे वेगवेगळे आहार बनवले होते. विद्यार्थिनींसाठी वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा आयोजित केल्या. मुलींसाठी अंताक्षरी, ट्रेझर हंट, संगीत खुर्ची असे फनी गेम्सही झाले.
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व बक्षीस वितरण झाले. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन आणि आश्रमगीताने झाली. नर्सिंग कॉलेजच्या प्र. प्राचार्या अर्चना बाईत यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्या परकार नर्सिंग महाविद्यालयच्या प्राचार्य प्रज्ञा बसणकर यांनी विद्यार्थिनींना अवर नर्सेस अवर फ्युचर, द इकॉनॉमिक पॉवर ऑफ केअर या यावर्षीच्या परिचारिका दिनाच्या संकल्पनेबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींना नर्सिंग क्षेत्रातील संधी व नर्सिंग क्षेत्रात होणारे बदल याबद्दल माहिती दिली. महर्षी कर्वे संस्थेच्या स्थानिक समिती सदस्य संपदा जोशी यांनी विद्यार्थिनींना त्यांचे नर्सिंग क्षेत्रातील अनुभव सांगितले. मुली त्यांचे काम कसे कुशलतेने करू शकतात, याबद्दल माहिती दिली. या वेळी बीसीए कॉलेज प्र. प्राचार्या स्नेहा कोतवडेकर उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com