खेड-भाजपकडून विधानसभेसाठी गुहागर मतदारसंघावर दावा

खेड-भाजपकडून विधानसभेसाठी गुहागर मतदारसंघावर दावा

भाजपचा विधानसभेसाठी
गुहागर मतदारसंघावर दावा


बालेकिल्ल्या हाती ठेवण्यासाठी कार्यकर्ते सक्रीय


सकाळ वृत्तसेवा ः

खेड, ता. १३ : लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर आता कोकणात विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार डॉ. विनय नातू यांना महायुतीकडून उमेदवारी मिळावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. २००९ पर्यंत भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या गुहागरमधून पुन्हा एकदा गुहागरवर भाजपकडून दावा केला आहे.
कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी भाजपकडे होता. याच विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार (कै.) तात्यासाहेब नातू यांनी तब्बल चार वेळा आमदारकी भूषवली होती.

त्यानंतर या ठिकाणी चार वेळा भाजपकडून डॉ. विनय नातू हे आमदार राहिले आहेत. मात्र २००९ साली हा विधानसभा मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेच्या ताब्यात देण्यात आला आणि गणित फिरले. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड विधानसभा मतदारसंघ हा बाद झाला. गुहागर विधानसभा मतदारसंघात खेड तालुक्यातील काही भाग येतो. भाजपकडून हा विधानसभा मतदारसंघ काढून घेण्याची मोठी किंमत युतीला आजवर चुकवावी लागली आहे.
राज्यात दोन वर्षांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. त्यामुळे आता शिवसेना भाजप व अजित पवार यांची राष्ट्रवादी, रामदास आठवले यांची आरपीआय अशी महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता हा मतदारसंघ भाजपकडे यावा ही मागणी जोर धरू लागली आहे. विद्यमान आमदार ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा आता या निवडणुकीत पराभव करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आता दावा करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com