Konkan Tourism
Konkan Tourismesakal

Konkan Tourism : गणपतीपुळे पर्यटकांनी गजबजले; दोन दिवसांत 40,000 पर्यटकांची समुद्र किनारी हजेरी

महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावरील निवडणुका तीन टप्प्यात विभागल्या गेल्या आहेत. त्याचा परिणाम पर्यटनावर झाला.
Summary

गणपतीपुळेमध्ये शनिवारी दिवसभरात सुमारे २० हजार पर्यटकांनी हजेरी लावल्याचे मंदिर प्रशासनकाडून सांगण्यात आले.

रत्नागिरी : लोकसभा निवडणूक (Ratnagiri Lok Sabha Elections) आणि वाढते तापमान यामुळे कोकणातील समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांची प्रतीक्षाच होती. मात्र, विनायकी चतुर्थीला जोडून शनिवार, रविवारी सुट्या आल्यामुळे प्रसिद्ध गणपतीपुळे पर्यटनस्थळ प्रथमच पर्यटकांनी (Tourists) गजबजले. सलग दोन दिवस सुमारे वीस हजार पर्यटकांनी दररोज हजेरी लावली. यामध्ये सर्वाधिक पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्रातील पर्यटक वर्गाचा समावेश होता. यंदा हंगामातील पहिलीच गर्दी झाल्यामुळे गणपतीपुळ्यातील व्यावसायिक सुखावले आहेत.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावरील निवडणुका तीन टप्प्यात विभागल्या गेल्या आहेत. त्याचा परिणाम पर्यटनावर झाला असून कोकणातील पर्यटकस्थळांवर (Konkan Tourism) गर्दीचा लवलेश नव्हता. दरवर्षी ७ मेनंतर कोकणातील किनारे पर्यटकांनी फुलून जातात. मात्र, ही गर्दी कुठेच नव्हती. ७ मे रोजी कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रातील मतदान झाल्यानंतर पर्यटकांची पावले समुद्रकिनाऱ्यांकडे वळू लागली आहेत.

Konkan Tourism
Konkan Tourism : कोकणातील स्वप्नवत गाव 'अणसुरे'; गावात काय आहे खास?

शनिवारी विनायकी चतुर्थी होती. त्यानंतर जोडून रविवार आल्यामुळे पर्यटकांनी गणपतीपुळेला प्राधान्य दिले होते. कोल्हापूर, सातारा, सांगली या परिसरातील बहुसंख्य पर्यटक गणपतीपुळेत दाखल झाले होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या भागातील अनेक गाड्या आलेल्या असल्याचे गणपतीपुळेतील व्यावसायिकांनी सांगितले. मुंबई, पुण्यातील निवडणूक पुढील आठवड्यात पूर्ण होणार असल्याने तेथील पर्यटक पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. फिरायला बाहेर पडणारा सरकारी कर्मचारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त असल्यामुळे पर्यटनावर परिणाम झाला आहे.

Konkan Tourism
Konkan Tourism : हॉलिवूड, थायलंड, पट्टाया इथला समुद्र कोकणी माणसासाठी निसर्गानं 'या' गावाला दिलाय!

गणपतीपुळेमध्ये शनिवारी (ता. ११) दिवसभरात सुमारे २० हजार पर्यटकांनी हजेरी लावल्याचे मंदिर प्रशासनकाडून सांगण्यात आले. रविवारीही तेवढीच गर्दी होती. त्याचा फायदा किनाऱ्यावरील फेरीवाल्यांना झाला. पर्यटक फेरीबोटी, जेटस्की, बलूनद्वारे समुद्र सफर करताना दिसत होते. उंट, घोडे सवारीत अनेक जणं व्यस्त होते. दिवाळी, ख्रिसमसनंतर प्रथमच एवढी गर्दी गणपतीपुळे पाहायला मिळाली. हॉटेलबरोबरल निवासही फुल्ल होती.

दोन दिवसांमध्ये एक कोटीच्या घरात उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, यंदा हंगाम १० जूनपर्यंत राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. १५ जूनला नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा वगळता निवडणूक निकाल चार जूनला जाहीर होणार आहे. त्यानंतर पहिल्या आठवड्यात पर्यटकांची संख्या किनारी भागात राहील.

Konkan Tourism
Konkan Railway : कोकण रेल्वे हाऊसफुल्ल; चाकरमान्यांनी धरली परतीच्या प्रवासाची वाट, तिकिटासाठी मोठ्या रांगा

गेले दोन दिवस पर्यटकांचा राबता वाढलेला आहे. निवासासाठी कमी बजेट असलेला वर्ग अधिक होता. सर्वाधिक पश्‍चिम महाराष्ट्रातील वर्ग गणपतीपुळेत अधिक फिरायला आलेले पाहायला मिळाले. मुंबई, पुण्यातील लोकांची संख्या थोडी कमी आहे.

-प्रमोद केळकर, हॉटेल व्यावसायिक

शनिवारपासून गर्दी सुरू झाली. त्याचा फायदा आम्हा व्यावसायिकांना झाला आहे. पुढील महिनाभर हे चित्र राहील.

-किसन जाधव, व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com