वेताबाच्या जयघोषाने आरवली दुमदुमली

वेताबाच्या जयघोषाने आरवली दुमदुमली

83175
आरवली ः श्री देव वेतोबाची आजची पूजा.
83176
आरवली ः श्री देव वेतोबाच्या दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी.


आरवलीत वेतोबाचा जयघोष

वर्धापन दिन उत्साहात ः दर्शनासाठी राज्यभरातून भाविक

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १२ ः आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबाचा वर्धापन दिन आज उत्साहात झाला. राज्यभरातील भाविकांनी श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले. भाविकांच्या उपस्थितीत ८ मेपासून सुरू झालेला हा वर्धापन सोहळा बुधवारपर्यंत (ता. १५) सुरू राहणार आहे.
आरवली श्री देव वेतोबा वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धा, श्रींची पालखी प्रदक्षिणा व अभिषेक, श्री. काळे (सांगली) यांचा अभंग, नाट्यगीत व भावगीतांचा ‘स्वराभिषेक’ कार्यक्रम, नाईक-मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग, विविध धार्मिक विधी, कलानीलयम ढवळी फोंडा-गोवा प्रस्तुत ‘पदन्यास’ हा भरतनाट्यम् नृत्याविष्कार आदी कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांना आरवलीसह जिल्हाभरातील भाविकांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
आज मुख्य वर्धापन दिनी मंदिरामध्ये सकाळपासून पूर्णाहूती, बलिदान, दुपारी महानैवेद्य, महाआरती, त्यांनतर महाप्रसाद, रात्री श्रींची पालखी प्रदक्षिणा व श्री देव गिरोबा नाट्य मंडळ, आरोस प्रस्तुत मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती वि. वा. शिरवाडकर लिखित व प्रवीण मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ हे तीन अंकी नाटक झाले. या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्गसह रत्नागिरी, मुंबई, पुणे, गोवा, बेळगाव, कोल्हापूर आदी भागांतून भविकांनी श्री देव वेतोबाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सुमारे २ ते ३ तास रांगेत उभे राहून भविकांनी श्री वेतोबाचे दर्शन घेतले. उद्या (ता. १३) रात्री ८ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता श्री रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ले यांचा नाट्यप्रयोग, मंगळवारी (ता. १४) रात्री ८ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता श्रींची इच्छा नाट्य मंडळ, तेंडोली प्रस्तुत वि. वा. शिरवाडकर लिखित ‘संगीत ययाती आणि देवयानी’ हे तीन अंकी पौराणिक नाटक सादर करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. १५) रात्री ८ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी व गावकर, मानकरी, आरवली ग्रामस्थांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com