पाडलोस रवळनाथ माऊलीचा
वर्धापन सोहळा उत्साहात

पाडलोस रवळनाथ माऊलीचा वर्धापन सोहळा उत्साहात

83197
पाडलोस ः मंदिर जीर्णोद्धारात योगदान दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला.

पाडलोस रवळनाथ माऊलीचा
वर्धापन दिन सोहळा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ ः पाडलोस श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त मंदिराच्या छप्पर दुरुस्ती कामास विनामोबदला काम करणाऱ्या मेस्त्री, लाईट काम, रंगकाम व विशेष सहकार्य करणाऱ्यांचा देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यामध्ये नंदा गावडे, आनंद गावडे, रामदास केणी, सुनील गावडे, महेश गावडे, सखाराम मेस्त्री, सुमन गावडे, सुरत गावडे, अमित गावडे, गुंडू नाईक, इंद्रसेन गावडे, प्रशांत माधव, सुनील गावडे, नामदेव नाईक, विलास गावडे, सत्यवान नाईक, तुकाराम मेस्त्री, संतोष आंबेकर, मनोज गावडे, साहिल गावडे, राजन पटेकर, दत्ताराम गावडे, देऊ गावडे, मुकुंद गावडे, नामदेव न्हावी यांचा सन्मान केला. पाडलोस श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील अनेकांचे योगदान, दातृत्व लाभले आहे. जवळपास ५५ वर्षांनी छपराची दुरुस्ती केली आहे. देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचे मानकरी आनंद गावडे, नंदा गावडे यांनी सांगितले. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन मंदिराचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दिलीप गावडे यांनी सूत्रसंचालन केले. हरी गावडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com