घोणसे घाटात 
ट्रकला अपघात

घोणसे घाटात ट्रकला अपघात

घोणसे घाटात
ट्रकला अपघात
म्हसळा : अपघातग्रस्त घोणसे घाटातून सिमेंट घेऊन नागोठणेकडून म्हसळाकडे येणाऱ्या ट्रकला शुक्रवारी (ता. १०) सकाळी १० वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून ट्रकचे व सिमेंटचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त ट्रक भरधाव असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या मोरीजवळ आदळून अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सिमेंट पोती भरून एक ट्रक शुक्रवारी सकाळी नागोठणेकडून म्हसळ्याकडे राष्ट्रीय महामार्गावरून येत होता. दरम्यान, घोणसे घाटातील केळेवाडी या परिसरात तीव्र उतार आणि शीघ्र वळणावर चालकाचे भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्यालगतच्या मोरीला जाऊन धडकला. या अपघातात ट्रकसह आतील मालाचे मोठे नुकसान झाले. येथील पोलिस कर्मचारी नवीन असल्यामुळे अपघाताची नोंद आणि डीआर देण्यास विलंब होत असल्याचे प्रभारी एपीआय पवन चौधरी यांनी सांगितले.
--------
महाड शहरामध्ये
डेंगीचे रुग्ण
महाड : महाड शहरामध्ये काही डेंग्यूचे रुग्ण आढळले असल्याची माहिती समोर आली असून जिल्हा आरोग्य प्रशासनाने याची गंभीर दखल घेत महाड नगर परिषदेसह संभाव्य परिस्थितीचा आढावा घेतला आहे. महाड शहरातील काही खासगी रुग्णालयात डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले होते. त्यामुळे त्यांची जिल्हा आरोग्य प्रशासनाने त्वरित दखल घेत या रुग्णांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी रुग्णांच्या घरी जाऊन सुरू असलेल्या उपचाराविषयी माहिती व परिस्थिती जाणून घेतली. रुग्ण आढळल्याने नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह डेंग्यू संदर्भात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची चाचपणी करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. अनावश्यक पाणीसाठे नष्ट करून अन्य ठिकाणचे पाणीसाठेदेखील नष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये म्हणून नगर परिषदेमार्फत आवश्यक ती औषध फवारणी व धूर मारणे सुरू केले आहे. यावेळी नागरिकांनीदेखील आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग तसेच महाड नगर परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
----
दहा लाखांची
तळोज्यात वीजचोरी
पनवेल : महावितरणच्या वाशी येथील भरारी पथकाने तळोजा येथील वावंजे गावात तब्बल सव्वा दहा लाख रुपयांची वीजचोरी पकडली आहे. घरामध्ये मागील १७ महिन्यांपासून वीज चोरी करण्यात येत असल्याचे महावितरणने केलेल्या तपासणीत आढळून आले. त्यामुळे महावितरणने या घरातील दाम्पत्याविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा येथील वावंजे गावात राहणारे परेश पाटील यांच्या घरात वीजचोरी होत असल्याची माहिती महावितरणच्या वाशी येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पानतावणे यांना मिळाली होती. त्यानुसार ५ एप्रिलला दुपारी भरारी पथकाने परेश पाटील याच्या घरावर छापा मारून वीज मीटरची तपासणी केली होती. या तपासणीत विजेचे मापन मीटरमध्ये व्यवस्थितरित्या होऊ नये यासाठी मीटरला येणाऱ्या सर्व्हिस वायरला काळ्या रंगाच्या सर्व्हिस वायरने टॅपिंग करण्यात आले होते. त्यावर एमसीबी स्वीचला थेट वायर जोडून मीटर पार्शली बायबास केल्याचे आढळून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com