हुश्श...! शिवडाव धरणाचे पाणी गडनदीत दाखल

हुश्श...! शिवडाव धरणाचे पाणी गडनदीत दाखल

83278
कणकवली : शिवडाव धरणाचे पाणी आज कणकवली शहरातील गडनदीपात्रात दाखल झाले.


हुश्श...! शिवडाव धरणाचे पाणी गडनदीत दाखल

कणकवलीसह लगतच्या गावांना दिलासा : शहरावरील पाणी टंचाई संकट टळले

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १३ : शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात दाखल झाल्याने कणकवली शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्‍यान कणकवली शहरासह हळवल, हरकूळ, सांगवे आदी गावांच्याही नळयोजना पुन्हा कार्यान्वित झाल्‍या आहेत.
गतवर्षी कणकवली तालुक्‍यात सरासरी पेक्षा २० टक्‍के कमी पाऊस झाला होता. तर गडनदीपात्रातील बंधाऱ्यांना गळती लागली. त्‍यामुळे एप्रिल पासूनच कणकवली शहर आणि तालुक्‍यातील अन्य गावांत पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्‍या होत्या. कणकवली शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या कोंडीतही पाणी साठा कमी झाला होता. यावर पर्याय म्‍हणून नगरपंचायतीने या परिसरातील गाळ उपसा केला. तसेच बंधाऱ्याच्या वरील भागात शिल्‍लक असलेले पाणी आणून शहरवासीयांना पाणी पुरवठा सुरळीत ठेवला होता. तर गडनदीकाठच्या हरकुळ, हळवल आदी गावांच्या नळयोजना ठप्प झाल्‍या होत्या.
कणकवली शहराला दररोज पंधरा लाख लिटर्स पाणी लागले. गडनदीपात्रात आठ ते दहा दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्‍लक असल्‍याने कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी शिवडाव धरणाचे पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला पत्र दिले होते. त्‍यानुसार ३० रोजी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्‍यांनी कणकवली नळपाणी योजना असलेल्‍या गडनदीपात्राची पाहणी केली आणि १ मे रोजी शिवडाव धरणाचे पाणी गडनदी पात्रात सोडण्यात आले. हे पाणी आज गडनदीपात्रातील शहर हद्दीमध्ये दाखल झाले. नदीपात्रात पाणी दाखल झाल्‍याने कनकनगर येथील बंधाऱ्यामधील प्लेट काढून हे पाणी जॅकवेल भागात आणण्यात आले आहे. त्‍यामुळे आता पाऊस पडेपर्यंत कणकवली शहरवासीयांची पाणी टंचाईतून सुटका झाली आहे.
--
नदीकाठच्या योजना पुन्हा कार्यान्वित
दरम्‍यान शहरवासीयांना पाणी कमी पडू नये यासाठी कनकनगर येथील नळयोजनेच्या जॅकवेल भागातील गाळ उपसा देखील केला आहे. त्‍यामुळे येथील भागात मोठा पाणी संचय होत आहे. तर शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात आल्‍याने कणकवली शहराबरोबरच सांगवे, हरकुळ, हळवल आदी नदीकाठच्या गावांच्याही नळयोजना पुन्हा कार्यान्वित झाल्‍या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com