विद्यार्थ्यांचा विकास आमचे कर्तव्य

विद्यार्थ्यांचा विकास आमचे कर्तव्य

swt134.jpg
83300
पणदूरः येथे संस्थेमार्फत प्रशालेतील माध्यमिक व उच्च माध्यमिकमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यशाळेत बोलताना आपा गावडे, नागेंद्र परब आदी.

विद्यार्थ्यांचा विकास आमचे कर्तव्य
आपा गावडेः पणदूर प्रशालेतील कार्यशाळेत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रथम स्थान देऊन काम करण्यासाठी तसेच बहुजन समाजामधील ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण देणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष आपा गावडे यांनी केले.
वेताळबांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पंणदूरतिठा येथे संस्थेमार्फत प्रशालेतील माध्यमिक व उच्च माध्यमिकमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये नियोजन केलेल्या कामांपैकी राहिलेल्या कामांचा विचार विनिमय करून ते पूर्ण करावे असेही सुचविण्यात आले. त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये कामांबाबत विविध कमिट्या स्थापन करून सुयोग्य नियोजन करण्यात आले. यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक मालवणकर  प्रशालेचे पर्यवेक्षक एम. जी. कर्पे, ज्येष्ठ शिक्षक व संस्था संचालक एम. एस. पाटील यांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन केले आणि उच्च माध्यमिक कर्मचाऱ्यांसाठी ज्येष्ठ शिक्षक प्राध्यापक श्री. गावकर यांनी मार्गदर्शन केले.
पुढील शैक्षणिक वर्षामधील नियोजन केलेल्या कामांची काटेकोरपणे अंमलबजावणी कशी करावी याबाबत संस्थेचे सचिव नागेंद्र परब यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. संस्था अध्यक्ष आपा गावडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रथम स्थान देऊन काम करण्यासाठी तसेच बहुजन समाजामधील ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण देणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव सर्व कर्मचाऱ्यांना करून दिली. त्याचबरोबर शैक्षणिक कामामध्ये येणाऱ्या अडचणींना उपाय करण्यासाठी संस्था नेहमी आपल्या सोबत आहे, हे सुद्धा स्पष्ट केले. या कार्यशाळेसाठी संस्था उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, खजिनदार सुधाकर वळंजू, संस्था संचालक अॅड. अरुण गोडकर, आनंद भोगले, संचालिका रिना सावंत, रविंद्र कांदळकर हे उपस्थित होते. आभार एम. जी. कर्पे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com