संविधान म्हणजे देशवासीयांचा गौरव

संविधान म्हणजे देशवासीयांचा गौरव

swt133.jpg
83299
मळेवाडः येथे आयोजित प्रबोधन मेळाव्यात बोलताना समतादूत सगुण जाधव. व्यासपीठावर दीपक पडेलकर, डॉ. विवेक कदम, दिगंबर मसूरकर व अन्य मान्यवर.

संविधान म्हणजे देशवासीयांचा गौरव
सगुण जाधवः मळेवाड शाळेत प्रबोधन मेळाव्यात प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ः ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दाने भारतीय संविधानाची सुरुवात होते. यातून ‘भारतीय’ म्हणून आपली ओळख करून दिली जाते. संविधानातील खरा देशहिताचा उद्देश नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. भारतीय संविधान म्हणजे सर्व देशवासीयांचा गौरव व सन्मान ग्रंथ होय, असे प्रतिपादन समतादूत सगुण जाधव यांनी मळेवाड येथे केले.
समता प्रेरणाभूमी संवर्धन समिती सावंतवाडीच्या वतीने येथील मळेवाड शाळा नंबर १ च्या सभागृहात ‘संविधान व शिक्षण अधिकार प्रबोधन मेळावा २०२४’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘संविधान का समजून घ्यावे?’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष दीपक पडेलकर, प्राथमिक आरोग्य केंद्र, रेडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कदम हे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. यावेळी पोलिस पाटील दिगंबर मसूरकर, मधुकर जाधव, समता प्रेरणाभूमीच्या उपाध्यक्षा भावना कदम, अंकुश कदम, कांता जाधव, मोहन जाधव उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. विवेक कदम, विशेष अतिथी व मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मोहन जाधव यांनी गुलाब पुष्प देऊन उपस्थितांचे स्वागत केले. पहिल्या सत्राचे प्रास्ताविक ममता जाधव तर सूत्रसंचालन चंद्रशेखर जाधव यांनी केले. समतादूत सगुण जाधव यांनी समता प्रेरणाभूमीच्या संविधान व शिक्षण अधिकार प्रबोधन मेळाव्याचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात गट चर्चेचे आयोजन करण्यात आले. गटचर्चेचे सूत्रसंचालन दीपक जाधव यांनी केले. सिद्धार्थ जाधव, निखिल जाधव, वैष्णवी जाधव या युवा कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. ‘आमचा शिक्षणाचा अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करताना अंकुश कदम यांनी, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात दीपक पडेलकर यांनी, महापुरुषांच्या शिकवणीचा विसर पडला, तर आम्ही त्यांच्या तत्त्वज्ञानाचे मारेकरी ठरू, असे प्रतिपादन केले.
उपस्थितांमध्ये कांता जाधव, वासुदेव जाधव, मिलिंद नेमळेकर, मोहन जाधव, पल्लवी जाधव, सिद्धार्थ जाधव, शिवाजी जाधव, अशोक जाधव, गणपत जाधव, दादू जाधव, दिलीप जाधव, दीपाली जाधव, नीलेश जाधव, रामा मसूरकर, एकनाथ जाधव. शिवाजी राठीये आदी उपस्थित होते. मोहन जाधव यांनी आभार मानले.

चौकट
प्रबोधन चळवळीला गती देणे आवश्यक
डॉ. विवेक कदम म्हणाले, ‘‘चळवळीचे कार्य करण्यासाठी समर्पणाची व त्यागाची गरज असते. बुद्धीची आणि वाणीची शक्ती ज्या समाजाला साध्य होते, तो समाज अग्रेसर ठरतो. यासाठी जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवणे गरजेचे आहे. तरुणांचे सोशल नेटवर्किंग सेंटर तयार करून प्रबोधनाच्या चळवळीला गती द्या.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com