क्रिकेटमध्ये रामेश्वर सुपर स्ट्रायकर्स विजेता

क्रिकेटमध्ये रामेश्वर सुपर स्ट्रायकर्स विजेता

swt135.jpg
83301
कणकवलीः ‘सिंधुगर्जना चषक २०२४’ चा मानकरी रामेश्वर सुपर स्ट्रायकर्स संघ ठरला.

क्रिकेटमध्ये रामेश्वर सुपर स्ट्रायकर्स विजेता
कणकवलीतील ‘सिंधुगर्जना चषक’ः गुरुकृपा ग्लेडिएटर्स उपविजेता
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ः एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथक आयोजित सिंधुगर्जना चषक २०२४ क्रिकेट स्पर्धा कणकवली येथे पार पडली. या स्पर्धेत कृष्णराज सातवसे यांच्या रामेश्वर सुपरस्ट्रायकर्स संघाने नेहा भोसले हिच्या नेतृत्वाखाली सिंधुगर्जना चषकावर नाव कोरले. शुभम पवार यांचा गुरुकृपा ग्लेडिएटर्स संघ मिनल साबळे हिच्या नेतृत्वाखाली उपविजेता ठरला. स्पर्धेत सहा संघांनी सहभाग घेतला.
ही क्रिकेट स्पर्धा ब्राह्मणदेव मंदिर कनकनगर येथील मैदानावर झाली. स्पर्धेतील सर्व खेळाडू हे सिंधुगर्जना पथकातील वादक होते. वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक संघाच्या संघनायक या मुली होत्या. कनकस्टार संघमालक कल्पेश महाडेश्वर, अनुरी वॉरियर्स संघमालक अनुजा ऋषिकेश भिसे, स्वयंभू रवळनाथ स्पोर्ट्स संघमालक जोगेश राणे, गुरुकृपा ग्लेडिएटर्स संघमालक शुभम पवार, डी. एस. स्वराज संघमालक सुमंगल सावंत, रामेश्वर सुपर स्ट्रायकर्स संघमालक कृष्णराज सातवसे यांचे संघ होते. आय.पी.एल. प्रमाणेच लिलाव प्रक्रियेने सर्व पथकातील खेळाडूंची निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धेत १० सामने खेळविण्यात आले. अंतिम सामना रामेश्वर सुपर स्ट्रायकर्स विरुद्ध गुरुकृपा ग्लेडिएटर्स या संघांमध्ये रंगला. यात रामेश्वर सुपर स्ट्रायकर्स संघ सरस ठरला. अक्षय मांडवकर याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. मुलांमध्ये उत्कृष्ट फलंदाज रोशन परब, उत्कृष्ट गोलंदाज आदित्य घाडीगावकर, क्षेत्ररक्षक म्हणून ऋषिकेश परब, मुलींमध्ये उत्कृष्ट फलंदाज साक्षी येंडे, गोलंदाज नेहा भोसले यांना गौरविण्यात आले. बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी गटविकास अधिकारी तथा सेन्सॉर बोर्ड सदस्य विजय चव्हाण, अॅड. प्राजक्ता शिंदे, कणकवली पोलिस अधिकारी किरण मेहते, कणकवली अर्बन निधी बँक संचालक प्रीतम पारकर आदी उपस्थित होते. सर्व वादकांचे त्यांच्या कार्याबद्दल व राज्यात नावलौकिक कमावून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल कौतुक करण्यात आले.
यावेळी सिंधुगर्जना पथकाच्या अध्यक्षा सुरेखा भिसे, प्रा. हरीभाऊ भिसे, कार्याध्यक्ष सर्वेश भिसे, अनुजा भिसे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, गणेश काटकर, विजय शिंदे, संघमालक कृष्णराज सातवसे, जयवंत सातवसे, कल्पेश महाडेश्वर, सुमंगल सावंत, जोगेश राणे, खजिनदार शुभम पवार, पथक प्रमुख नितीन चव्हाण, उपप्रमुख प्रज्ञेश निग्रे, महिला प्रमुख रिदा मन्सुरी, उपप्रमुख मीनल साबळे व पथकातील सर्व पदाधिकारी आणि वादक उपस्थित होते. पंच म्हणून रोहित म्हापसेकर, वैभव म्हापसेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com