खेडमध्ये १२ गावांमध्ये टंचाई

खेडमध्ये १२ गावांमध्ये टंचाई

२१ (पान ३ साठी)

खेडमध्ये १२ गावे ३५ वाड्यांमध्ये टंचाई

सवणस भागातून टँकरसाठी दोन अर्ज ; ग्रामस्थांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १२ : तालुक्यात रणरणत्या उन्हामुळे उपलब्ध जलस्त्रोत तळ गाठत आहेत. यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. सद्यस्थितीत १२ गावे ३५ वाड्यांमध्ये पाणीटंचाईचा दाह निर्माण झालेला असतानाही प्रशासनाकडे अजूनही अवघा एकच टँकर उपलब्ध होता. दोन दिवसापूर्वी एक खासगी टँकर उपलब्ध झाल्याने प्रशासनासह ग्रामस्थांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
सवणस येथील दोन वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. सद्यस्थितीत तहानलेल्या गाव-वाड्यांमध्ये टँकरच्या ८७ फेऱ्या धावत आहेत. तालुक्यातील सुसेरी-देवसडे येथील ६ वाड्यांमध्ये पाण्याचा पहिला टँकर धावू लागल्यापासून एकामागोमाग एक टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल होत आहेत. एकीकडे तहानलेल्या गाव-वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच दुसरीकडे प्रशासनाकडे अवघा एकच शासकीय टँकर उपलब्ध होता. यामुळे टँकर प्रशासनाला कसरत करावी लागत होती. दोनच दिवसापूर्वी एक खासगी टँकर प्रशासनाच्या ताफ्यात दाखल टँकरच्या प्रतिक्षेतील झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळत आहे. तालुक्यातील फुरूस येथील तब्बल १२ वाड्यांना पाणीटंचाईचे चटके बसत असून गावठाण वाडीतील ५०४ ग्रामस्थांचा पाण्यासाठी सुरू असलेला आक्रोश अजूनही कायम आहे. यापूर्वी ८ गावातील २६ वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. गेल्या काही दिवसात ४ गावे १० वाड्यांची भर पडली आहे. खवटी खालची, वरची धनगरवाडी, अस्तान, चाटव - धनगरवाडी, कशेडी-बोरटोक- बंगला, थापेवाडी, चिरणी-धनगरवाडी टँकरने गाव-वाड्यांनाही या पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत १२ गावे ३५ वाड्यांना पाणी पुरवठा सुरू आहे.


--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com