ग्रामस्थांना मिळाले दोन लाखाचे सुरक्षाकवच

ग्रामस्थांना मिळाले दोन लाखाचे सुरक्षाकवच

१६ (टूडे २ साठी, अँकर)

- rat१३p३.jpg-
२४M८३२७४
घाणेखुंट - विमा काढण्यासाठी ग्रामस्थांचे फॉर्म भरताना सरपंच व जयभवानी मित्रमंडळाचे पदाधिकारी.

ग्रामस्थांना मिळाले दोन लाखाचे सुरक्षाकवच

घाणेखुंट ग्रामपंचायतीचा उपक्रम; आरोग्यविम्याचा लाभ

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः घरातील प्रमुख व्यक्तीचे अपघातात, आजारपणात किंवा अकाली मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची प्रचंड फरपट होते. त्यामधून सुरक्षा व्हावी यासाठी अनेकजण विमा काढतात. हे लक्षात घेऊन गावातील कुटुंबांना सुरक्षाकवच मिळावे, या हेतूने खेड तालुक्यातील घाणेखुंट ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा दोन लाखाचा विमा उतरवला आहे.
घाणेखुंटचे सरपंच राजू ठसाळे यांनी नेहमीच विविध विधायक उपक्रम राबवून तालुक्यात ग्रामपंचायतीची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहमीच सामान्य लोकांना समोर ठेवून लोकाभिमुख कारभार आणि योजना राबविण्यावर त्यांनी भर दिला. याबाबत सरपंच राजू ठसाळे म्हणाले, घरातील प्रमुख पुरुष अथवा स्त्रीचे आकस्मिक निधन झाल्यानंतर कुटुंबातील इतर लोकांची परवड होते. शासनाच्या काही लाभदायी योजना अत्यल्प रक्कमेत जनतेसाठी असतात; परंतु अपुरी माहिती, त्याचे मिळणारे फायदे, उदासीनता व जनजागृतीमुळे ती हवी तशी राबवली जात नाही. याच उद्देशाने माझ्या गावातील ग्रामस्थांसाठी प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात आली. या योजनेतून केवळ २० रुपयात दोन लाखाचे विमा सुरक्षाकवच लोकांना मिळतो. त्यानुसार ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांचे २० रुपये वार्षिक भरणार आहे. कुणाचा आकस्मिक अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख व अंशतः अपंगत्व आल्यास १ लाख रुपयाचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यातून ग्रामस्थांना सवय लागावी व त्यानंतर आपोआप निरंतर त्यांच्या बँकखात्यातून ही योजना चालू राहावी हा हेतू आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त ग्रामस्थांना लाभ मिळावा यासाठी जय भवानी मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. ग्रामस्थांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे ग्रामपंचायतीचे कौतुक केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com