थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून माचाळची निवड

थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून माचाळची निवड

१८ (टूडे पान २ साठी, मेन)


- rat१३p८.jpg-
२४M८३३१०
माचाळ ट्रेक.

माचाळची थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून निवड

‘एमटीडीसी’कडून घोषणा; निसर्गरम्य भाग, पावसाळ्यात पर्यटकांची ट्रेकिंगसाठी झुंबड

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः कोकणात समुद्रकिनारे आणि येथील निसर्ग कायमच पर्यटकांना खुणावत असतो. याच कोकणात लांजा तालुक्यातील असं एक ठिकाण आहे, जे पर्यटकांना खुणवतंय. या ठिकाणाला कोकणातलं मिनी महाबळेश्वर असंही म्हणतात. हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचा रस्ता, परिसरात पूर्णपणे धुके, थंडगार वातावरण, डोंगरावरून कोसळणारे धबधबे अशा सर्व गोष्टींनी वेढलेले हे गाव पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. हे गाव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण अर्थात पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे.
लांजा तालुक्यातील छोटसं माचाळ गाव समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार फुटांवर वसलेलं आहे. खाली उतरलेले आभाळ, आल्हाददायक स्वच्छ हवा. या वातावरणातला प्रवास आपल्याला ताजातवाना करतो आणि पावसाळ्यात हे गाव पर्यटकांना खुणावते. माचाळ गावातून मुचकुंदी नदीचा उगम होतो. खरंतर, या गावात मुचकुंदी ऋषींची गुहा आहे. याच ठिकाणाहून या नदीचा उगम झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या नदीला मुचकुंदी नदी असे म्हणतात. अवघे ३०० ते चारशे लोकवस्तीचं हे माचाळ गाव आहे. तेथील घरे कौलारू डोंगरउताराची आणि मातीची आहेत. पावसाळ्यात येथे कायम धुके असते. त्यामुळे घरांच्या चहुबाजूला झाडांच्या पानांनी पूर्णपणे शाकारणी करावी लागते. माचाळची दुसरी खासियत म्हणजे इथून विशाळगडावर पाणी, दूध पुरवणे किंवा इतर कामासाठी सतत येऊन-जाऊन असतात. एका डोंगरावर वसलेले माचाळ घनदाट जंगलांनी समृद्ध तर आहे; पण इथल्या जंगलाचं वैशिष्ट्य हे की, या जंगलामध्ये औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणूनच या ठिकाणी आल्यावर इथला निसर्ग पाहिल्यानंतर पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. माचाळ हे गाव पदभ्रमणासाठीचे उत्तम ठिकाण आहे. रत्नागिरी जिल्हा हा एक उत्तम पर्याय, सुंदर निसर्ग, खळाळणारे पाणी, दाट धुके, नागमोडी वाटा, अतिशय नयनरम्य परिसर माचाळचा पाहण्याजोगा आहे. येथे पावसाळ्यात भेट देऊन कोकणातल्या निसर्गसौंदर्याचा आगळावेगळा आनंद नक्कीच घ्या, असे आवाहन एमटीडीसीकडून करत आहे.

औषधी वनस्पती मुबलक
एका डोंगरावर वसलेले माचाळ घनदाट जंगलांनी समृद्ध तर आहे; पण इथल्या जंगलाचं वैशिष्ट्य हे की, या जंगलामध्ये औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणूनच या ठिकाणी आल्यावर इथला निसर्ग पाहिल्यानंतर पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. माचाळ हे गाव पदभ्रमणासाठीचे उत्तम ठिकाण आहे.
------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com