सिंधुदुर्गात लवकरच गवळी समाज भवन

सिंधुदुर्गात लवकरच गवळी समाज भवन

83324
माडखोल ः येथे आयोजित गवळी समाज मेळाव्याचे दीपप्रज्वलनाने उद्‍घाटन करताना अजय बिरवटकर. व्यासपीठावर उदय पाटील, प्रकाश गवळी, अशोक दाते, चंद्रकांत चिले, बापूसाहेब चिले, दशरथ शृंगारे, बयाजी बुराण आदी.


जिल्ह्यात लवकरच गवळी समाज भवन

अजय बिरवटकर ः माडखोलमध्ये समाज मेळाव्यास प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १३ ः गवळी समाज बांधवांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गवळी समाज भवन उभारण्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील गवळी समाजाने संघटित होऊन समाज भवन साकारण्यासह आपला विकास साधावा. त्यासाठी ट्रस्टच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी दिली. समाजातील जुन्या कालबाह्य आणि महिलांबाबतच्या वेदनादायक रुढी, परंपरा बंद करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचा १६ वा वर्धापन दिन सोहळा माडखोल येथील रुद्र सभागृहात आयोजित करण्यात आला. यानिमित्त आयोजित मेळाव्यास जिल्ह्यातील यादव बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष बिरवटकर, ट्रस्टचे सरचिटणीस उदय पाटील, सहचिटणीस प्रकाश गवळी, विश्वस्त अशोक दाते, चंद्रकांत चिले, बापूसाहेब चिले, ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष दशरथ शृंगारे, उपकार्याध्यक्ष बयाजी बुराण, सचिव नामदेव गवळी, खजिनदार सीताराम केळुसकर, सहसचिव रामचंद्र भालेकर, सदस्य बाबुराव भालेकर, रामदास बुराण, विश्राम केळूसकर, कृष्णा पंदारे, प्रशांत हनपाडे, सुरेश वरेकर, प्रशांत बुराण, सीताराम गवळी, चंद्रसेन लाड, चंद्रकांत चिले, निकिता गवळी, अमिषा गवळी, सल्लागार शंकर काटाळे आदी उपस्थित होते.
उदय पाटील आणि अशोक दाते यांनी मेळाव्यातील महिलांच्या उपस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. शिखर संस्था अध्यक्ष बिरवटकर यांनी गवळी समाज भवनाच्या जागा खरेदीसाठी १ लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले. उपस्थित मान्यवरांनीही गवळी समाजाने आपल्या न्याय व हक्कासाठी संघटित होऊन ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन केले. शीतल पाटील (कोल्हापूर) यांनी स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महिलांसाठी आयोजित ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रांगोळी व वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या. गवळी समाजातील वधू-वर परिचय कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष दशरथ शृंगारे यांनी, सूत्रसंचालन सदस्य रामदास बुराण यांनी केले. आभार उपकार्याध्यक्ष बयाजी बुराण यांनी मानले.
...........
चौकट
मान्यवरांचे सत्कार
यावेळी विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी केलेल्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. यात गोवा विद्यापीठातून बी.ए.एम.एस ही पदवी प्राप्त केल्याबद्दल माडखोल-धवडकी येथील डॉ. सरोजा चिले, साहित्य अकादमीच्या दिल्ली महोत्सवात मालवणी बोलीतील काव्य वाचन व सहभागाबद्दल सावंतवाडी-कारिवडे येथील प्रा. नामदेव गवळी, इंडियन हिस्टोरी या विषयामध्ये गोवा विद्यापीठातून पी.एच.डी संपादन केल्याबद्दल यांना इतिहास अभ्यासक सुनील बुराण, राज्यस्तरीय ‘ओवी ज्ञानेशाची’ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल आंबेगाव येथील प्रकाश केळुसकर यांच्यासह गुणवंत व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com