रत्नागिरी ः लो. टिळकांच्या स्मारकाचे रूपडे पालटणार

रत्नागिरी ः लो. टिळकांच्या स्मारकाचे रूपडे पालटणार

rat13p12.jpg
83350
रत्नागिरीः लोकमान्य टिळकांचे जन्मस्थानाचे सुशोभीकरण.
rat13p13.jpg
83351
लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानातील परिसरातील सुशोभीकरण.
-----------
लोकमान्य टिळकांच्या स्मारकाचे रूपडे पालटणार
छताचे काम पूर्ण; घराचा मूळ ढाचा न बदलता दुरुस्ती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ः लोकमान्य टिळकांच्या रत्नागिरीतील जन्मस्थळाची दूरवस्था झाली होती. याबाबत शहरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शासनाकडून या जन्मस्थळाच्या सुशोभीकरणासाठी पावले उचलण्यात आली. एप्रिल २०२३ मध्ये त्या कामाचा नारळ फोडण्यात आला होता. शासनाकडून प्राप्त झालेल्या ४ कोटी ५ लाखांच्या निधीतून आता हे सुशोभीकरण व दुरुस्तीचे काम मार्गी लावण्याच्या कामाला वेग आला आहे.
टिळक जन्मभूमी हे स्मारक बांधकाम खात्याच्या ताब्यात होते. त्या काळात या स्मारकाची दुरुस्ती आणि देखभाल उत्तमप्रकारे होत होती. आता हे स्मारक पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येते. त्यांच्या जन्मभूमीतील स्मारकाची अवस्था अत्यंत दयनीय बनलेली होती. इमारतीच्या छताची दूरवस्था झाली होती. स्मारकाच्या आवारात मांडाची बाग आहे. सुमारे एक एकर क्षेत्र आहे; पण या क्षेत्राची साफसफाईअभावी आतील परिसर पडिक, गचाळ, बकाल बनले. भरपूर पाणी असलेली विहीर असूनही वेळोवेळी नादुरुस्त पंपाअभावी येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. पाणी साठवण्याची व्यवस्था नाही. पर्यटकांसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहावरील साठवणूक टाकीमध्ये पाणी पुरवणारी पाईपलाईन नादुरुस्त, दर्शनीभागात वास्तू अपूर्ण अशा समस्या उभ्या होत्या.
टिळक जन्मस्थानाची माहिती सांगण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था नाही. येथील साऱ्या समस्यांची दखल पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली. गतवर्षी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी केलेल्या घोषणेनुसार रत्नागिरीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थानाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला. रत्नागिरी पालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान सुशोभीकरणासाठी शासनाकडून ४ कोटी ५ लाखाचा निधी मंजूर केला आहे.
या स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. इमारतीवरील छताची दुरुस्ती झाली आहे; मात्र पूर्वीचा जुन्या असलेल्या छताचा साज आज नव्याने करताना त्याची रचना पूर्वीप्रमाणेच ठेवली आहे. आतील छप्पराचे लाकडी काम केलेले आहे. अंतर्गत परिसरात सुसज्ज असे प्रसाधनगृह, फूटपाथ, मिनी संवादकट्टा, संग्रहालय, सभगागृह अशी कामेदेखील प्रगतीपथावर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com