हातेरी-हिर्लोक साई मंदिराचा २१ ला वर्धापन दिन सोहळा

हातेरी-हिर्लोक साई मंदिराचा २१ ला वर्धापन दिन सोहळा

हातेरी-हिर्लोक साई मंदिराचा
२१ ला वर्धापन दिन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ः ‘मामाचो गांव’ फाऊंडेशन, मुंबई मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे २१ मे रोजी साईधाम, मामाचो गांव, हातेरी-हिर्लोक येथे साई मंदिराचा सहावा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता. २१) सकाळी ६.३० वाजता मंगलप्रभात, ७.३० वाजता श्रींना मंगलस्नान, रुद्राभिषेकपूर्वक महापूजा, ८ वाजता हवनादी धार्मिक कार्यक्रम, ११.४५ वाजता श्रींची माध्यान्ह पूजा, महानैवेद्य, दुपारी १२ वाजता श्रींची महाआरती, १२.३० वाजता महाप्रसाद, २ वाजता श्रींची महापूजा, सायंकाळी ४ वाजता प्राथमिक शिक्षक कला मंच, कुडाळतर्फे गायन मैफल (गायक-राजेश गुरव, हार्मोनियम-विजय सावंत, पखवाज-दीपक मेस्त्री, तबला-सिद्धेश वेंगुर्लेकर, निवेदक-हृदयनाथ गावडे), ७ वाजता श्रींची धुपारती, सवाद्य पालखी सेवा, सांस्कृतिक कार्यक्रम, श्रींची शेजारती, रात्री १० वाजता अमर जवान क्रिएशन प्रस्तुत लेखक गंगाराम गवाणकर निर्मित, जगदीश गवस, शेखर गवस दिग्दर्शित जिल्हा व राज्य पातळीवर विविध पारितोषिके प्राप्त दोन अंकी विनोदी नाटक ''कोर्टात खेचीन'' होणार आहे. यामध्ये सत्यवान गावकर, मनस्वी जाधव, शुभम जाधव, प्रणाली म्हसकर, जगदीश गवस, सौरभ जाधव, वेदांत जंगले, संतोष चव्हाण, हेमंत समंजसकर, साईनाथ सावंत, विठ्ठल गावकर या कलावंतांचा समावेश आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मामाचो गांव फाऊंडेशन, मुंबई यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com