-सुबुद्धीच्या माध्यमातून अंमली पदार्थमुक्त अभियान

-सुबुद्धीच्या माध्यमातून अंमली पदार्थमुक्त अभियान

२७ ( पान ४ साठीमेन)

‘सुबुद्धी’तून अमली पदार्थमुक्त अभियान

जिल्हा पोलिसदलाचा पुढाकार ; सोशल मीडियावर होणार जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा पोलिसदलाकडून अमली पदार्थविरोधी कारवाई करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसदलाने आता ''सुबुद्धी'' या अमली पदार्थविरोधी जनजागृती जनसंपर्क अभियानाला सुरवात केली आहे. यात सोशल मीडियावर अमली पदार्थांच्या गर्तेत सापडून एका तरुणाने आपल्या आयुष्याची कशी वाताहत लावली, याची माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे.
आताच्या काळात माणसाला अंतर्बाह्य पोखरणाऱ्या अमली पदार्थांची यादी सतत वाढतच आहे. सर्व प्रकारची मद्य, सर्व तंबाखू‌जन्य पदार्थ ही तर परिचित मादक द्रव्ये आहेतच; परंतु अफू, गांजा, चरस या पूर्वीपासून वापरत असलेल्या अमली पदार्थांपासून ते अलीकडच्या कोकेन, हेरॉईन, इफेड्रीन, अॅम्फेटिमाईन, एलएसडी, एमडी आणि आता डिझाईनर ड्रग्जचे एक नवीन फॅड दिसून येत आहे. यात हे सर्व अमली पदार्थ सुटे न घेता कफसिरप, रम, पेप्सी किंवा कोकमध्ये मिश्रण करून घेण्यात येते. अमली पदार्थांच्या सेवनाचे अनेक मार्ग आहेत.
अमली पदार्थाचे मानवी मेंदूवर व शरीरावर परिणाम होत असल्याने व्यसनाला अनेक गुंतागुंतीच्या मानसिक समस्येला तोंड द्यावे लागते. या व्यसनांच्या अधीन झाल्यानंतर त्यांना ते मिळाले नाही तर काहीवेळा ते आत्महत्याही करतात. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी मनमोकळा संवाद साधावा. घरात तणावरहित वातावरण, मुलांबरोबर अभ्यासेतर गप्पा, पालकांचा निर्व्यसनीपणा आदी बाबींची आवश्यकता आहे. याचबरोबर मुलांना स्वातंत्र्य देताना ती स्वैराचार तर करत नाहीत ना याकडेही कटाक्ष पाहिजे. पालकांनी पालक म्हणून आपली भूमिका बजावणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिसदलाने ''सुबुद्धी'' जनसंपर्क अभियानाद्वारे जनजागृती सुरू केली आहे.
------------
चौकट
जनजागृती परिणामकारक

''सुबुद्धी'' जनजागृती जनसंपर्क अभियानाद्वारे पोलिस विभागाने एकूण १० क्लिप्स तयार केल्या आहेत. त्या द्वारे नागरिकांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगण्यात येत असून, तरुण पिढीने यापासून लांब राहण्याबाबत जागृती करण्यात येत आहे. आता नागरिकांना प्रत्यक्ष बोलावून जनजागृती करण्यापेक्षा सोशल मीडियाद्वारे जनजागृती जास्त परिणामकारक ठरत असल्याने पोलिस विभागाने ''सुबुद्धी'' जनजागृती जनसंपर्क अभियान सुरू केले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com