बालनाट्य प्रशिक्षणाचा  चिपळूणमध्ये प्रारंभ

बालनाट्य प्रशिक्षणाचा चिपळूणमध्ये प्रारंभ

बालनाट्य प्रशिक्षणाचा
चिपळूणमध्ये प्रारंभ
चिपळूण, ता. १३ः अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे आयोजित बालनाट्य प्रशिक्षणाचा प्रारंभ शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात लोकमान्य टिळक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते झाला. या वेळी नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, कार्याध्यक्ष दिलीप आंब्रे, बालनाट्य प्रशिक्षणाचे प्रशिक्षक सुरेश गायधनी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले. अनेक वर्षे बंद असलेली नाट्य परिषदेची चिपळूण शाखा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या शाखेचा बालनाट्य प्रशिक्षण शिबिर हा पहिलाच कार्यक्रम होत असून या शिबिराला पालक, विद्यार्थी यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. या शिबिरासाठी खास नाशिकहून सुरेश गायधनी उपस्थित आहेत. या वेळी विभावरी रजपूत, प्रा. संगीता जोशी, संकेत हळदे, मंगेश बापट, आदिती देशपांडे, ओंकार रेडीज, डॉ. मीनल ओक, संजय कदम आदी उपस्थित होते. २० मेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. २० मे रोजी शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांची दोन बालनाट्ये सांस्कृतिक केंद्राच्या रंगमंचावर सादर होणार आहेत.
-------------
बोरजमध्ये उद्या
संयुक्त जयंती महोत्सव
खेड ः तालुका बौद्ध समाजसेवा संघ, तालुक्यातील बोरज शाखा क्र. ७७च्या वतीने बोरज-बौद्धवाडी येथील पंचशिल बुद्धविहारात १५ मे रोजी महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. सकाळी ९ वा. धम्म ध्वजारोहण, ९.३०वा. बुद्धवंदना व पूजापाठ, ११ वा. सत्कार समारंभ, ३ वा. सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री ९ वा. मुंबई येथील उषा सेजुले व लवेल येथील संजय गमरे व पार्टी यांचा कव्वालीचा जंगी सामना होणार आहे. महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बोरज माता रमाई मंडळ, पंचशिल शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक ट्रस्ट, पंचशिल युवा मंडळाने केले आहे.

--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com