शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी
विद्यार्थ्यांचा घोटगेवाडीत गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा घोटगेवाडीत गौरव

83404
घोटगेवाडी ः विद्यार्थी गौरव कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्ग.

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी
विद्यार्थ्यांचा घोटगेवाडीत गौरव

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १३ : ‘हमारा स्वाभिमान भारत’ आयोजित यशवंतराव शेंडे शिष्यवृत्ती कार्यक्रम तालुक्यातील घोटगेवाडी येथे पार पडला. याअंतर्गत पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले. यात प्रथम क्रमांक श्रृती केसरकर, व्दितीय ओम भणगे व तृतीय क्रमांक सौरभ देसाई यांनी पटकावला. प्रथम क्रमांकास सायकल, द्वितीय व तृतीय क्रमांकास स्मार्ट वॉच देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
हमारा स्वाभिमान भारत, मुंबई ही संस्था मुलांच्या शैक्षणिकदृष्ट्या तसेच महिलांच्या स्वयम् रोजगारासाठी प्रोत्साहित करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी कार्यरत असते. परीक्षेच्या पारितोषिक समारंभास घोटगेवाडी सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे, केंद्रप्रमुख सदाशिव पाडगावकर, कीर्ती विद्यालय घोटगेवाडीचे मुख्याध्यापक श्री. कांबळे, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दळवी, संस्थेच्या संचालिका वीणा केसरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाबी तुळसकर, विवेक केसरकर, उमेश केसरकर, ग्रामपंचायत सदस्य प्रीती भणगे, नूतन पांगम, तंटामुक्ती अध्यक्ष रुक्मिणी नाईक, श्री. मेथे, श्रीमती दळवी, श्रीमती म्हसगे, सदानंद केसरकर, प्रकाश देसाई, गजानन वाडकर, लक्ष्मी करमळकर, अदिती मणेरीकर उपस्थित होते. स्वाभिमान भारत संस्थेच्या संचालिका प्रियाताई यांचे शिक्षकांनी विशेष आभार व्यक्त केले. स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल संस्थेने कीर्ती विद्यालय आणि प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com