क्राईम

क्राईम

३६ ( पान ३ साठी, क्राईम)

कशेडी बोगद्यातील
अपघातात ५ जखमी

खेड ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी बोगदा पार केल्यानंतर काही अंतरावर ११ मे रोजी रात्री दोन मोटारींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारीतून प्रवास करणारे पाचजण जखमी झाले असून, कशेडी पोलिस मदतकेंद्रातील कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली व वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ चिपळूण ते पाली जाणारी मोटार आणि नेरूळ नवी मुंबई ते चिपळूण येथे जाणारी मोटार यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रेश्मा इस्माईल फनकर (वय ३८, रा. सुधाकर पाली, जि. रायगड), साजिदा हसरत डांगू (२६, रा. पुणे), माहीन आसरा डांगू (रा. पुणे), हनुमान लक्ष्मण शेट्ये (४६, रा. महाड, जि. रायगड) व समीधा सुहास मोरे (४६, रा. सुधाकर पाली, जि. रायगड) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलिस मदतकेंद्रातील सहाय्यक पोलिस फौजदार समिल सुर्वे, पोलिस कर्मचारी रामागडे घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात पाठवून त्यांनी वाहतुकीची कोंडी होणार नाही याची खबरदारी घेतली. जखमींना नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने कळंबणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
------------

पिरलोटेत दुचाकीला जीपची धडक

खेड ः तालुक्यातील पिरलोटे येथील एका हॉटेलच्या अलीकडे ६ मे रोजी रात्री खेड येथून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला विरुद्ध दिशेने आलेल्या जीपची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी जीपचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताची माहिती दुचाकीचालक भगवान सखाराम चिपळुणकर यांनी पोलिसांना दिली आहे. ते त्याच्या ताब्यातील दुचाकीने ६ मे रोजी आवाशी येथून मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण बाजूकडे जात होते. रात्री पिरलोटे येथील हॉटेलच्या अलीकडे आले असता मुंबई-गोवा जाणाऱ्या लेनच्या चुकीच्या बाजूने आलेल्या जीपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही जीप सुमित शेटप्पा पवार (वय १९ वर्षे, रा. खांदाटपाली, चिपळूण) चालवत होता. या अपघातात भगवान चिपळूणकर गंभीर जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com