वणव्यात ७ हेक्टरवरील ११०० कलमे खाक

वणव्यात ७ हेक्टरवरील ११०० कलमे खाक

पान १

८३३८२

डिंगणीत ७ हेक्टरांतील ११०० कलमे खाक
अग्नीचे तांडव ः ११ शेतकऱ्यांचे ७ लाख रुपयांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी चाळकेवाडीच्या माळरानावर लागलेल्या वणव्यामध्ये ७ हेक्टरवरील १ हजार १०० काजू, आंब्याची कलमे जळून भस्मसात झाली. यामध्ये सुमारे ११ शेतकऱ्यांचे ६ ते ७ लाखांचे नुकसान झाले आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. वणवा लागल्याची माहिती समजताच डिंगणीचे तलाठी सुधीर सोनावणे आणि कृषी अधिकारी भानुदास दौंड यांनी तत्काळ पाहणी करून पंचनामा केला.
डिंगणी परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. वणव्याने सुमारे ७ हेक्टरचा परिसर व्यापला होता. वणव्याची आग काही शमता शमत नव्हती. पालापाचोळा, गवत असल्याने तो वेगाने पसरत वाटेत येईल ती कलमे गिळंकृत करत होती. वाटेत रस्ता लागल्यामुळे तो तिथे शमला. सुमारे १० हेक्टर परिसर वणव्याने व्यापला होता. त्यापैकी ६ हेक्टरवरील कलमांना त्याचा फटका बसला आहे.
माळरानावर वणवा लागून नुकसान झाल्याचे समजताच शिवसेना शिंदे गटाचे युवासेना पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सुधीर चाळके व भाजपचे मयूर निकम यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षित न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com