चिपळूण-खडपोलीवासीय दोन दिवस अंधारात

चिपळूण-खडपोलीवासीय दोन दिवस अंधारात

rat13p31.jpg
83432
चिपळूणः विद्युत पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले खडपोली येथील ग्रामस्थ.
---------------
खडपोलीत रोहित्र जळाल्याने
दोन दिवस विज पुरवठा खंडीत
संतप्त ग्रामस्थांमुळे उतरले रस्त्यावर
चिपळूण, ता. १३ः तालुक्यातील खडपोली येथील रोहित्र जळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. परिणामी परिसरातील लोकांना दोन दिवस अंधारात काढावे लागले. ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर सोमवारी दुपारनंतर रोहित्र बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
गेल्या काही दिवसापासून उन्हाचा कडाका वाढतो आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्रामस्थ हैराण होत आहेत. रात्रीच्या वेळी वीज नसेल तर ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास खडपोली येथील रोहित्र जळले. त्यानंतर त्वरित वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी गेले दोन दिवस रोहित्र बसवण्यासाठी ग्रामस्थांकडून पाठपुरावा सुरू होता. संबंधित अधिकारी रजेवर गेले आहेत, वरिष्ठांना कळविले आहे, अशी उत्तरे तेथील कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांना देण्यात येत होती. शेवटी सोमवारी विद्युत पुरवठा नियमित न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद आडरेकर यांच्यासह ग्रामस्थ रस्त्यावर उतरले.
त्यानंतर महावितरणकडून रोहित्र बसवण्याची कार्यवाही सुरू झाली. सोमवारी सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने खडपोली येथील मोहल्ला रामवाडी परीट वाडी येथील लोकांना दोन दिवस अंधारातच काढावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com