पान एक-आखवणेत पाच घरे फोडली

पान एक-आखवणेत पाच घरे फोडली

swt1325.jpg
83468
आखवणे ः पुनर्वसन गावठणातील दत्ताराम नागप यांच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त पसरवून टाकण्यात आले होते.

टीपः swt1326.jpg
83480
आखवणे ः श्वानपथक घर परिसरातच घुटमळले.

आखवणेत पाच घरे फोडली

भोम पुनर्वसन गावठणमधील प्रकार; परिसरात खळबळ

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १३ ः आखवणे - भोम नागपवाडी पुनर्वसन गावठणातील पाच घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली. यातील एका घरातून ३४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. ही घटना काल (ता. १२) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. इतर चार घरांतील चोरीचा तपशील कळालेला नाही. एकाच रात्रीत पाच घरे फोडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. तपासाकरिता आणलेले श्वान परिसरातच घुटमळले.
अरुणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठाण खारेपाटण-भुईबावडा मार्गावरील मांगवली फाटा येथे करण्यात आले आहे. बहुतांशी प्रकल्पग्रस्त येथे राहत असले, तरी अनेकजण मुंबईत देखील राहतात. मुंबईत राहत असलेले दत्ताराम सीताराम नागप हे ९ मे रोजी कार्यक्रमाच्या निमित्ताने गावी आले होते. काल सायंकाळी ते पुनर्वसन गावठणातील घर बंद करून भोम गावी सप्ताहाकरिता गेले. रात्री १ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम आटोपून ते पुन्हा घरी आले. त्यांनी घराचा पुढील दरवाजा उघडून प्रवेश केला असता त्यांना पाठीमागील दरवाजा, बेडरूमचे दरवाजे उघडलेले दिसून आले. याशिवाय दोन्ही बेडरूममधील कपाटे उघडून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले दिसून आले. त्यांनी कपाटात ठेवलेली १८ हजार रुपयांची रक्कम आणि देवाऱ्यात असलेली २०० ग्रॅम वजनाची १६ हजार ८०० रुपये किमतीची चांदीची मूर्ती चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी चोरी झाल्याची माहिती तातडीने शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देखील देण्यात आली. यानंतर शेजाऱ्यांनी आजूबाजूला असलेली बंद घरांची पाहणी केली असता स्वप्नाली सुरेश नागप, मधुकर अनंत नागप, सुरेश पुनाजी नागप, अंकुश विठोबा नागप यांच्या घरांच्या दरवाजांचीही कुलपे, कडीकोयंडे फोडलेले दिसून आले. सहायक पोलिस निरीक्षक आसीफ बेग, उपनिरीक्षक अमोल पाटील रात्रीच घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. आज सकाळी श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले; परंतु घराच्या परिसरातच ते घुटमळले. भरवस्तीत रात्री बारा-साडेबारा वाजण्यापूर्वी पाच घरे फोडल्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
----------
चौकट
मुद्देमालाचा आकडा वाढण्याची शक्यता
पुनर्वसन गावठणातील पाच घरे चोरट्यांनी फोडली आहेत. त्यापैकी दत्ताराम नागप यांच्या मुद्देमालाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. इतर घरांतील लोक मुंबईत राहत असल्यामुळे त्यांच्या घरातील नेमके कोणते साहित्य किवा रोकड चोरीस गेली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही; परंतु मुद्देमालाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com