ज्येष्ठांनी योगाभ्यास, प्राणायाम करा

ज्येष्ठांनी योगाभ्यास, प्राणायाम करा

२२ (टुडे ३ साठी, अॅंकर)


-rat१४p८.jpg-
P२४M८३५१८
रत्नागिरी : श्रीराम मंदीर कट्टा येथे ज्येष्ठ नागरिक स्नेहमेळाव्यात बोलताना डॉ. शाश्वत शेरे.
------------
स्मृतीभ्रंश टाळण्यासाठी ज्येष्ठांनी योगाभ्यास, प्राणायाम करावा

डॉ. शाश्वत शेरे ः श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा स्नेहमेळावा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : वाढत्या वयोमानामुळे ज्येष्ठांमध्ये स्मृती भ्रंशाने मानसिक आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढलेले असून त्यावर मात करण्यासाठी ध्यानधारणा, योगाभ्यास, प्राणायाम आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होऊन आपले निर्मितीक्षम छंद जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शाश्वत शेरे यांनी ज्येष्ठांच्या मेळाव्यात केले.
येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या मेळाव्यात डॉ. शेरे यांनी ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. स्मृतिभ्रंश या ज्येष्ठांमधील सर्वव्यापी आजाराबाबत बोलताना डॉ. शेरे म्हणाले, ज्येष्ठांना चिंता, नैराश्य, भ्रमिष्ठावस्था तसेच मनोविकारांना सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी ज्येष्ठांच्या नातेवाईकांनी घ्यावयाची काळजी तसेच कुटुंबातील संवाद जपून भक्ती, कर्म आणि ज्ञान या आध्यात्मिक मार्गाने जीवनातील बदलांना समर्थपणे कसे सामोरे जाता येईल, याविषयी सखोल मार्गदर्शन करून ज्येष्ठानी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देऊन शंका समाधान केले.
डॉ. शेरे यांची पत्नी शमिका शेरे यांनीही ज्येष्ठांच्या जीवनातील बदलांना ज्येष्ठानी कसे सामोरे जावे याविषयी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी उपस्थित राहून वयाच्या ९२ व्या वर्षीही कसे आत्मनिर्भर राहता येते, याची प्रचिती दिली. ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे मुख्य संयोजक अण्णा लिमये यांनी स्वागत केले. सचिव सुरेंद्र घुडे यांनी कट्ट्यातर्फे ज्येष्ठांना निरामय जीवनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर एप्रिल व मे महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे शुभेच्छापत्र देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. या वेळी नित्या प्राणिक हीलींग सेंटरचे तेजस महागावकर यांनीही प्राण ऊर्जा वापरून शरीर कसे निरोगी ठेवावे, याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. अर्चना उतेकर यांनी आभार मानले.
----------
चौकट १
पुढील मेळावा ८ जूनला
पुढील मासिक स्नेहमेळावा ८ जून रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या वेळी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर अश्विन वैद्य हे ''ज्येष्ठांच्या डोळ्यांची निगा'' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कट्ट्यातर्फे करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com