कोकण रेल्वे

कोकण रेल्वे

१८ (टुडे पान २ साठी, सेकंड)
(टीप- दोन बातम्या आहेत. शेजारी-शेजारी घ्याव्यात.)

(रेल्वेचे चित्र वापरावे)

दादर-मडगाव लोकल एक्स्प्रेस कागदावरच

''कोरे'' प्रशासनाकडे लोकप्रतिनिधींची मागणी

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ : गणेश चतुर्थीसाठी कोकण रेल्वे गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही सेकंदात फुल्ल झाले. त्यामुळे या प्रकाराची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन दादर-सावंतवाडी- मडगाव अशी नियमित लोकल सोडण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, कोरे प्रशासन व लोकप्रतिनिधी याची दखल घेत नसल्याने ही लोकल सध्या कागदावरच आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून दररोज धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, दिवा पॅसेंजर, जनशताब्दी एक्स्प्रेस आदी रेल्वेगाड्यांना वर्षांचे ३६५ दिवस तुडूंब गर्दीने धावत असतात. रेल्वे तिकीट आरक्षण असले तरी प्रवाशांना गुरा-ढोरांप्रमाणे कोंबलेल्या अवस्थेत प्रवास करावा लागतो. शिवाय अनेक वेळा रेल्वे गाड्या उशिराने धावत असतात. कोकणातील प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादरपर्यंत दुसरी एक्स्प्रेस सोडण्याची मागणी केली जात आहे. मात्र अशी गाडी सोडण्या ऐवजी रेल्वे प्रशासन ''कोरे'' मार्गावरून दक्षिण व उत्तर भारतातील प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन गाड्या सोडून कोकणातील प्रवाशांना वेठीस धरत आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी यापूर्वीच दिला आहे.
--------------

(बातमी क्र. २)

‘एलटीटी-थिविम’ आठवड्यातून तीनदा धावणार

कोकण रेल्वेचा निर्णय : प्रवाशांची गर्दी वाढली

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ : कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते थिविम दरम्यान आठवड्यातून एकदाच धावणारी विशेष रेल्वेगाडी आता आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्याने या विशेष रेल्वे गाड्यांची वारंवारता वाढवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.
मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे नियमित रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी १०० ते ३०० वर गेली आहे. तसेच विशेष रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन होणे अशक्य झाले आहे. एलटीटी ते थिविम विशेष साप्ताहिक गाडी २० एप्रिलपासून दर शनिवारी सुरू करण्याची घोषणा कोकण रेल्वेने १२ एप्रिलला केली होती. तसेच थिविम ते एलटीटी ही विशेष साप्ताहिक गाडी २० एप्रिलपासून दर रविवारी धावत होती. परंतु गेल्या तीन आठवड्यांत या गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढल्याने विशेष रेल्वे गाड्यांची वारंवारता वाढवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला. या रेल्वे गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com