घोसाळे रत्नभूषण पुरस्काराचे मानकरी अमृत बर्जे

घोसाळे रत्नभूषण पुरस्काराचे मानकरी अमृत बर्जे

२४ (टुडे पान २ साठी, अॅंकर)


-rat१४p१३.jpg-
२४M८३५४८
घोसाळे : घोसाळे रत्नभूषण पुरस्काराचे मानकरी अमृत बर्जे यांना सन्मानित करताना अध्यक्ष मनोज घाडे.
----------

घोसाळे रत्नभूषण पुरस्काराचे मानकरी अमृत बर्जे

१६ वा वर्धापन दिन; साई भंडारा, महापूजा कार्यक्रम; मंदिराच्या जिर्णोद्धाराची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १४ ः तालुक्यातील घोसाळे येथील श्री साई विश्वस्त मंडळ, प्रगती महिला मंडळ व साईदीप क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साई भंडारा, सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वडवली गावचे सामाजिक कार्यकर्ते व बहुश्रुत व्यक्तिमत्त्व अमृत बर्जे हे यंदाचे घोसाळे रत्नभूषण पुरस्काराचे मानकरी ठरले.
अध्यक्ष मनोज घाडे यांच्या देखरेखखाली कार्यक्रम उत्साहात झाला. सकाळी पहाटे साई अभिषेक, काकड आरती, कळस पूजन ध्वजरोहण, होम हवन, साई पालखी मिरवणूक, श्रीसत्यनारायण पूजा, महाप्रसाद, हळदीकुंकू, ग्रामस्थांचे सुस्वर भजन, संस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम झाले. समाजातील विविध क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे व पडद्याआड राहणाऱ्या व्यक्तिमत्वाना शोधून पुरस्काराने सन्मानित करण्याची वैचारिक परंपरा गावाने जोपासली आहे. यावर्षी विशेष सत्कार मूर्ती वडवली गावचे अमृत बर्जे यांना घोसाळे रत्नभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मोठ्या जल्लोषात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साईच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. घराघरात पालखीचे स्वागत करण्यात आले. रात्री विविध गुणदर्शन कार्यक्रमात कला कौशल्याचे सादरीकरण करून वाहव्वा मिळवली. संघटित आणि गाव एकोप्प्याने वाटचाल करणाऱ्या घोसाळे गावाने यावर्षी पासून साई मंदिर जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्याचा संकल्प सोडला आहे .कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज घाडे यांच्या हस्ते मंदिर जीर्णोद्दारची घोषणा करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com