पिंगुळीची मृणाल सावंत नृत्य स्पर्धेमध्ये विजेती

पिंगुळीची मृणाल सावंत नृत्य स्पर्धेमध्ये विजेती

swt146.jpg
83554
पराडः नृत्य स्पर्धेत विजेत्या मृणाल सावंत हिला चषक व पारितोषिक देताना ज्येष्ठ मानकरी बाबा गावकर व मान्यवर. (छायाचित्र ः अजय सावंत)

पिंगुळीची मृणाल सावंत
नृत्य स्पर्धेमध्ये विजेती
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ः पराड (ता. मालवण) येथील दुर्गामाता युवक मंडळ व ग्रामस्थ आयोजित खुल्या जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली. ही स्पर्धा श्री दुर्गादेवी मंदिर पटांगणावर आयोजित करण्यात आली. स्पर्धेत द्वितीय क्रमांक समर्थ गवंडी (रेडी), तृतीय नंदिनी बिले (सावंतवाडी), उत्तेजनार्थ पूर्वा मेस्त्री (कणकवली), निकिता लाड (मालवण) यांनी मिळविला. परीक्षण नृत्य दिग्दर्शक राहुल कदम, सुयोग कदम यांनी केले. विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके व भव्य चषक ज्येष्ठ ग्रामस्थ मानकरी बाबा गावकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. ही पारितोषिके सुरेंद्र जबडे, आतिक हुसेनशेख, समीर पराडकर, संजय पराडकर, माजी उपसरपंच विवेक जबडे, सर्वेश नागवेकर, शुभम आवळेगावकर यांनी पुरस्कृत केली. बक्षीस वितरण कार्यक्रमास विवेक जबडे, समीर पराडकर, योगेश पाटकर, सुरेंद्र जबडे आदींसह मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. बक्षीस वितरणानंतर नाईक-मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com