पाडलोस-मडुरा रस्त्यावर हवी संरक्षक भिंत

पाडलोस-मडुरा रस्त्यावर हवी संरक्षक भिंत

83620
पाडलोस : कोसळलेली बाजूपट्टी दाखविताना भाजपचे काका परब.

पाडलोस-मडुरा रस्त्यावर हवी संरक्षक भिंत

काका परब ः पालकमंत्र्यांचे लक्ष वेधू

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः पाडलोस-मडुरा मार्गावरील केणीवाडा येथे खडीकरण केलेल्या रस्त्याची बाजूपट्टी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कोसळली. पाईपलाईनसाठी केलेल्या खोदाईकडे अधिकाऱ्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले. रस्त्याची बाजूपट्टी कोसळल्याने दोन वाहनांना बाजू देताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्यावर संरक्षक भिंतीची गरज असून, याकडे दुर्लक्ष करत खडीकरणाचे काम सुरू आहे. भविष्यात येथे अपघात झाल्यास सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असे भाजप युवामोर्चा सावंतवाडी तालुका सरचिटणीस तथा पाडलोस ग्रामपंचायत सदस्य काका परब यांनी सांगितले.
वर्षभरापूर्वी रस्त्याच्या बाजूने पाईपलाईनसाठी खोदाई करण्यात आली. त्यानंतर पावसाळ्यात साईडपट्टी कोसळल्यामुळे रस्ता धोकादायक बनला. एक वर्ष पूर्ण होऊनही अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केले आहे. या ठिकाणी संरक्षक भिंतीची गरज असून, याकडे दुर्लक्ष का होत आहे? असा प्रश्‍न परब यांनी केला आहे. केवळ कार्यालयात बसून रस्ते निर्धोक बनत नाहीत, तर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. प्रशासनाच्या या भोंगळ कार्यपद्धतीकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधणार असल्याचे परब यांनी सांगितले.
-----------
चौकट
कामचुकारपणा, की निधीची कमतरता?
पाडलोस-केणीवाडा येथील रस्ता वर्षभर धोकादायक स्थितीत आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कामचुकारपणा केला, की बाजूपट्टी सुरक्षित करण्यासाठी निधी नाही, असा प्रश्‍न परब यांनी केला आहे. खडीकरणाबरोबर अपघात टाळण्यासाठी संरक्षक भिंत बांधणेही तितकेच महत्त्वाचे असून, याकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com