गोव्यातील ‘सिप्ला’मध्ये
चाळीस जणांना नोकरी

गोव्यातील ‘सिप्ला’मध्ये चाळीस जणांना नोकरी

83638
सावंतवाडी ः कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह मान्यवर.


गोव्यातील ‘सिप्ला’मध्ये
चाळीस जणांना नोकरी

भोसले फार्मसी, पॉलिटेक्निकचे विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची गोवा येथील सिप्ला या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली. यामध्ये फार्मसीच्या ३७ व पॉलिटेक्निकच्या ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
भोसले फार्मसी हे ‘नॅक’ मान्यताप्राप्त व भोसले पॉलिटेक्निक हे ‘एनबीए’ मानांकनप्राप्त कॉलेज आहे. ‘सिप्ला’समवेत दोन्ही कॉलेजचा सामंजस्य करार झाला असून, गेली चार वर्षे येथील विद्यार्थ्यांना ‘सिप्ला’मध्ये नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, बी. फार्मसी प्राचार्य डॉ. विजय जगताप, डी. फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com