लोकसभा निवडणुकीत ‘एसटी’ मालामाल

लोकसभा निवडणुकीत ‘एसटी’ मालामाल

83643
कणकवली : लोकसभा निवडणुकीसाठी एस.टी. महामंडळाच्या बसेस आरक्षित केल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीत ‘एसटी’ मालामाल

४९ लाखांचे उत्पन्न; कर्मचाऱ्यांना सेवा, माल वाहतूक ट्रकचाही वापर

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १४ : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदानाच्या अनुषंगाने एसटी प्रशासनाच्या १२० बसेस आणि १७ मालवाहू ट्रक वापरण्यात आले. त्‍यामधून एस.टी महामंडळाला ४९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एसटीच्या संबंधित विभागाकडून ही माहिती मिळाली.
रत्‍नागिरी-सिंधुदुर्गात ७ मे रोजी मतदान झाले. तत्‍पूर्वी ६ मे रोजी कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथून निवडणूक पथकांना मुख्यालयापासून मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविणे आणि ७ मे रोजी मतदान केंद्रापासून पुन्हा मुख्यालयापर्यंत संबंधित पथकांना आणणे यासाठी एसटी महामंडळाने १२० बसेस आणि १७ मालवाहू ट्रकची व्यवस्था केली होती.
या सर्व गाड्यांच्या भाड्यापोटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाला शासनाकडून सुमारे ४९ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट व इतर साहित्य ने-आण करणे, यासह कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी एसटी बसची व्यवस्था केली होती. तसेच साहित्य वाहतुकीसाठी मालवाहू ट्रकचा वापरही करण्यात आला होता. दरम्‍यान, मोठ्या संख्येने निवडणूक कार्यक्रमासाठी एसटी बस आरक्षित झाल्‍याने जिल्हांतर्गत वाहतूक विस्कळीत झाली होती. ६ मे रोजीच्या बहुतांश रात्रवस्ती फेऱ्या रद्द करण्यात आल्‍या होत्या. त्‍यामुळे गावातून शहरात येणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com