स्पंदनमध्ये प्रणव काताळेचे सुयश

स्पंदनमध्ये प्रणव काताळेचे सुयश

३२ (पान ४ साठी)


- ratchl१४२.jpg
P२४M८३६४६
प्रणव काताळे
---------------

‘स्पंदन’मध्ये प्रणव काताळेचे यश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा तसेच अभ्यासाबरोबर त्यांच्यातील कलांचा विकास व्हावा. यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ दरवर्षी स्पंदन या कार्यक्रमाचे आयोजन करते. यातील एक स्पर्धा काळभोर येथील विश्वराज कॉलेज ऑफ नर्सिंग (जि. पुणे) येथे घेण्यात आली. यामध्ये लोटे परशुराम येथील एम. इ. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगने यशाची परंपरा कायम राखत यश मिळवले. यात पाश्चिमात्य वाद्य संगीत स्पर्धेत प्रणव तुकाराम काताळे याला तृतीय पारितोषिक मिळाले.
स्पर्धेत प्रणवने क्लॅप बॉक्स या वाद्यावर एक धून वाजविली होती. कोकणातील अतिदुर्गम डोंगराळ खेड तालुक्यातील आंबये या गावचा तो सुपुत्र आहे. त्याला संगीत क्षेत्राची लहानपणापासून आवड. संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करण्याचा त्याचा मानस असतो. विद्यापीठाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात संचालक डॉ. देवेंद्र पाटील, स्पंदनचे समन्वयक प्रकाश पाटील आदींच्या हस्ते त्याला सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पदक प्रदान करण्यात आले. एम.इ.एस.आय.एच.एस. डायरेक्टर डॉ. श्याम भाकरे, प्राचार्य मिलिंद काळे आदींनी प्रणवचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com