प्यार कभी मरता नही कादंबरीचे उद्या प्रकाशन

प्यार कभी मरता नही कादंबरीचे उद्या प्रकाशन

३५ (पान ४ साठी)

‘प्यार कभी मरता नही’चे उद्या प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ ः तालुक्यातील रामपूर येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी (कै.) डॉ. भारत लोटे यांच्या पत्नी संगीता लोटे यांनी वास्तव घटनेवर आधारित प्यार कभी मरता नही, या कादंबरीचे लेखन केले आहे. या कादंबरीचे प्रकाशन गुरुवारी (ता. १६) प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात सायंकाळी ५ ते ७ या वेळेस होणार आहे.
(कै.) डॉ. भारत लोटे हे हुशार, निष्णात, शांत मनमिळावू व प्रेमळ स्वभावाचे व्यक्तीमत्व. मदतीची हाक मारताच ते सेवेसाठी नेहमी तत्पर असायचे. याच डॉक्टरांना शेवटच्या क्षणी त्यांच्या आजारपणात रुग्णालयाच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे आणि सरकारी मदतीच्या अनास्थेमुळे त्यांना इच्छा मरण मागावे लागले. याच घटनेचा मागोवा संगीता लोटे यांनी‘ प्यार कभी मरता नही’ या कादंबरीत घेतला आहे. त्यांनी अनुभवलेल्या घटनेवरच कादंबरीचे लेखन केले आहे. या पुस्तक प्रकाशनासाठी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे, उपायुक्त राजा गायकवाड, आमदार शेखर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, नंदूरबारचे निवृत्त डीवायएसपी संभाजी सावंत, डॉ. यतीन जाधव, शरद तांदळे, प्रशांत पटवर्धन आदी उपस्थित राहणार आहेत.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com