डंपरच्या धडकेने टेम्पो उलटून २ जखमी

डंपरच्या धडकेने टेम्पो उलटून २ जखमी

८३६३७
टेंपो उलटून दोघे जखमी
हातखंबानजीक अपघात ः डंपरच्या धडक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गुरववाडी येथे महामार्गाचे काम करणाऱ्या डंपरने टेंपोला जोरदार धडक दिली. या अपघातात टेंपोत अडकून दोघे गंभीर जखमी झाले. टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून अपघात करणारा डंपर चालक पसार झाला. सकाळी साडेदहाच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातामुळे काहीकाळ महामार्गावरी वाहतुकीचा खोळंबा झाला. नीलेश साळुंखे (वय ३०) आणि गणेश कोळी (३०, दोघेही रा. नांद्रे, मिरज, सांगली) अशी जखमींची नावे आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मातीची वाहतूक करणाऱ्या डंपरने मिरजच्या दिशेने जाणाऱ्या टेपोला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, डंपर धडकून टेंपोवरच उलटला. या अपघातात टेम्पो चालक नीलेश साळुंखे व गणेश कोळी हे दोघे केबिनमध्ये अडकले. अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला. टेम्पोत अडकलेल्या गणेश कोळी यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज नाणीज धाम येथील रुग्णवाहिकेचे चालक बाळू केतकर यांच्यासह हातखंबा टॅबवरील वाहतूक पोलिस घटनास्थळी पोहोचले. टेम्पोत अडकलेल्या दोघांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com