मालवणात ‘हायमास्ट’ धूळखात

मालवणात ‘हायमास्ट’ धूळखात

83673
मालवण ः बोर्डिंग मैदानावर हायमास्ट मनोरा असा धूळ खात पडला आहे.

मालवणात ‘हायमास्ट’ धूळ खात

महेश कांदळगावकर ः सहा महिने उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ : नौदल दिनाच्या निमित्ताने येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षिततेसाठी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावरील हायमास्ट मनोरा काढून ठेवण्यात आला; मात्र या दौऱ्याला सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही पालिका प्रशासनाकडून अद्यापपर्यंत हा मनोरा पुन्हा उभारण्यात आला नाही. यापूर्वी पालिकेच्या स्थावर, जंगम मालमत्तेचे नुकसान झालेच आहे, आता यात हायमास्ट मनोऱ्याची भर पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासन हा हायमास्ट मनोरा केव्हा उभारणार, असा प्रश्न माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत कांदळगावकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे, की शहरात टोपीवाला हायस्कूलच्या मालकीचे बोर्डिंग मैदान आहे. या मैदानावर सायंकाळच्या वेळी चालण्याच्या व्यायामासाठी ज्येष्ठ नागरिक, मुले येत असतात. त्यामुळे या ठिकाणी पुरेसा प्रकाश असावा, या उद्देशाने टोपीवाला हायस्कूलच्या मागणीनुसार आमच्या पालिकेच्या कालावधीत हायमास्ट मनोरा बसविण्यात आला. तारकर्ली येथे ४ डिसेंबरला नौदल दिन आयोजित केला होता. या दिनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालवणात येणार होते. यासाठी त्यांच्या आगमन होण्याआधी बोर्डिंग मैदानाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने हेलिकॉप्टर लँडिंगला अडथळा होणारा हायमास्ट मनोरा मालवण पालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात काढून ठेवला होता. पंतप्रधानांचा दौरा होऊन आता जवळपास सहा महिन्यांचा कालावधी होत आला आहे; मात्र अद्यापही तो हायमास्ट पुन्हा उभारण्याची कोणतीही कार्यवाही पालिका प्रशासनाकडून झालेली नाही. सुमारे सात लाख खर्च करून बसविण्यात आलेला हायमास्ट प्रशासनाच्या दिरंगाईमुळे बोर्डिंग मैदानावर सध्या धूळ खात जमिनीवर पडला आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. त्या अगोदर हा हायमास्ट मनोरा पुन्हा उभारण्याची गरज आहे; अन्यथा तो खराब होण्याची शक्यता आहे.
.............
कोट
प्रशासकीय कालावधीत अशा दिरंगाईमुळे खतमशीन, बायो टॉयलेट गाड्या, पिंपळपार येथील रंगीत कारंजा, व्यापारी गाडी अशा स्थावर आणि जंगम मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात आता या हायमास्ट मनोऱ्याची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com