मांगर जळून गुरे होरपळली

मांगर जळून गुरे होरपळली

83697
मातोंड ः येथे लागलेल्या आगीत मांगर जळून खाक झाला.


मांगर जळून गुरे होरपळली

मातोंडमधील दुर्घटना ः सव्वा दोन लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १४ ः मातोंड-सुकाळेवाडी येथील बाळकृष्ण महादेव नेमण व विष्णू महादेव नेमण यांच्या घराशेजारील मांगराला अचानक आग लागून सुमारे २ लाख २० हजारांचे नुकसान झाले. या आगीत संपूर्ण मांगर जाळून खाक झाला. यात मांगरात असलेल्या एका गायीचा मृत्यू झाला, तर दोन गुरे होरपळून जखमी झाली. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मातोंड येथील नेमण यांच्या या मांगरात मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड तसेच गवत भरले होते. मांगराचे छप्पर लाकडी असल्याने आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केले. मांगरात असलेल्या गुरांना विष्णू नेमण व ग्रामस्थांनी बाहेर काढले; मात्र आत असलेल्या एका गायीसह एक गाभण म्हैस व एक वासरू ८० ते ९० टक्के भाजले. यातील गायीचा काही वेळाने मृत्यू झाला, तर म्हैस व वासरू गंभीर जखमी झाले.
या मांगरात असलेला सुमारे ४० हजार किमतीचा पॉवर विडर, सुमारे ५० हजार रुपये किमतीची दरवाजाची नवीन दोन उबली, सुमारे १५ हजार रुपये किमतीचे जळाऊ लाकूड व गवत, गुरे, छप्पर व इतर वस्तू असे मिळून सुमारे २ लाख २० हजारांचे नुकसान झाले. आगीची बातमी समजताच घटनास्थळी ग्रामपंचायत सदस्य दीपेश परब, राहुल प्रभू, ग्रामपंचायत कर्मचारी अरुण नेमण, ग्रामस्थ रणजित नेमण, राजन नेमण, माजी ग्रामपंचायत सदस्य सुविधा नेमण, अभी सावंत, महेश वडाचेपाटकर यांनी धाव घेतली. तलाठी किरण गजनीकर, मातोंड ग्रामपंचायत सरपंच मयुरी वडाचेपाटकर, वीज वितरणचे अधिकारी श्री. कोठावळे, लाईनमन अजित तळवणेकर, विठ्ठल जोशी, सत्यवान नाईक, पशुवैद्यकीय विभागाचे डॉ. बी. बी. चव्हाण यांनी पाहणी करून पंचनामा केला. नेमण कुटुंबीय गरीब असून, या नुकसानीमुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com