मुलीच्या लग्नातील आहेराची 
रक्कम आदिष्ठी मंदिराला दान

मुलीच्या लग्नातील आहेराची रक्कम आदिष्ठी मंदिराला दान

टीपः swt१४२८.jpg मध्ये फोटो आहे.
नडगिवे ः अनंत चव्हाण यांनी आपल्या मुलीच्या लग्नातील आहेराची रक्कम येथील आदिष्ठी मंदिराला दान केली. (छायाचित्र : एन. पावसकर)


मुलीच्या लग्नातील आहेराची
रक्कम आदिष्ठी मंदिराला दान

स्तुत्य उपक्रम ः चव्हाण यांचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १४ : खारेपाटण येथील रहिवासी अनंत भिकाजी चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुलीच्या लग्नात आलेली आहेराची रक्कम नडगिवे येथील आदिष्ठी मंदिराला दान केली. त्यांच्या या दानशूरपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अनंत चव्हाण हे खारेपाटणमध्ये पारंपरिक नाभिक व्यवसाय चालवतात. त्यांनी श्रद्धेने व सामाजिक बांधिलकी जपत मुलीच्या लग्नात आलेली आहेराची सर्व रक्कम आदिष्ठी मंदिराला दान दिली. त्यांनी याआधी सुद्धा दोन मुलींच्या लग्नात आलेल्या आहेराची सर्व रक्कम खारेपाटण येथील दोन मंदिरांना दान दिली होती. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. याबाबत श्री. चव्हाण यांनी सांगितले, ‘‘तिन्ही मुलींच्या लग्नाचा आहेर मंदिरसेवेसाठी अर्पण करण्याचा मानस होता. त्यानुसार ही सेवा केली आहे. भविष्यातही असेच सामाजिक कार्य सुरू ठेवणार आहे.’’ दरम्यान, मंदिराच्या ट्रस्टतर्फे चव्हाण यांचे आभार मानले. यावेळी मंदिर ट्रस्टचे अनिल कुलकर्णी, शांताराम घाडी, गोपीनाथ मेस्त्री, ओंकार चव्हाण आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com