मासेमारी करताना जलप्रदूषण टाळा

मासेमारी करताना जलप्रदूषण टाळा

मासेमारी करताना जलप्रदूषण टाळा

सागर कुवेसकर ः देवगडमध्ये सागरी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १४ ः पश्‍चिम किनारपट्टी भागातील मत्स्य उत्पादनावरील संभाव्य परिणाम टाळण्यासाठी समुद्रात मासेमारी करताना जलप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतली जावी. प्लास्टिक साहित्य किंवा पाण्यात विघटन न होणाऱ्या वस्तू टाकल्या जाऊ नयेत, असे आवाहन मत्स्य विभागाचे जिल्हा सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांनी येथे केले.
भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्थेच्या मुंबई विभागाच्यावतीने मत्स्य विभागाच्या सहाय्याने येथील देवदुर्ग मच्छीमार सहकारी संस्थेच्या सभागृहात ‘सागरी प्लास्टिक कचरा जागरुकता अभियान’ कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी श्री. कुवेसकर बोलत होते. व्यासपीठावर मत्स्य वैज्ञानिक अशोक कदम, नीतूकुमारी प्रसाद, डॉ. देवानंद उईके, स्वप्नील शिर्के, बहर महाकाल, येथील परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर, देवदुर्ग मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाळेकर, उद्योगपती नंदकुमार घाटे, डॉ. जयभास्करन आदी उपस्थित होते.
समुद्रातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर जनजागृती करण्यात येत आहे. जलप्रदूषणामुळे सागरी जीव धोक्यात येत असल्याने संभाव्य मत्स्यधनाची हानी टाळण्यासाठी सागरी कचरा कमी करण्याच्या उद्देशाने ‘ग्लोलिटर पार्टनरशिप प्रोजेक्ट’ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने उपस्थित मच्छीमार बांधवांना श्री. कदम यांनी आवश्यक माहिती दिली. प्रकल्पाचा उद्देश, त्याची गरज या अनुषंगाने मार्गदर्शन करताना त्यांनी समुद्रात मासेमारी करताना जलप्रदूषण टाळण्याचे आवाहन केले. समुद्रातील पाण्यात विघटन न होणाऱ्या प्लास्टिकसदृश वस्तू टाकल्या जाऊ नयेत, यासाठी मच्छीमारांनी सहकार्य करण्याची साद त्यांनी यावेळी घातली. यावेळी श्री. घाटे यांनी व्यवसायातील नवनवे बदल अंगीकारण्याची आवश्यकता असून आपल्या उन्नतीसाठी एकजूट आवश्यक असल्याचे सांगितले. श्री. पाळेकर यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. उईके यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. स्वप्नील शिर्के यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील मच्छीमार बांधव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com